नागरिकांसाठी एक नवीन योजना राबवली आहे. (scheme)आता दिव्यांग लोकांना लग्नासाठी प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार दिव्यांग नागरिकांना २.५० लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाते.दिव्यांग व्यक्तीने जर सामान्य व्यक्तीशी लग्न केले तर त्यांना १.५० लाख रुपये दिले जातात. जर दिव्यांग व्यक्तीने दुसऱ्या दिव्यांग व्यक्तीसोबत लग्न केले तर त्यांना २.५० लाख रुपये दिले जातात. ही रक्कम पती पत्नीच्या एकत्रित खात्यात डीबीटीद्वारे जना केली जाते.

या योजनेअंतर्गत पती पत्नीच्या खात्यावर जमा केलेली ५० टक्के रक्कम (scheme)ही ५ वर्षांसाठी एफडीमध्ये जमा असणे अनिवार्य आहे. जेणेकरुन त्यांना भविष्यात आर्थिक अडचण येणार नाही.दिव्यांग व्यक्तींच्या लग्नाबाबतचे विचार बदलण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग-सामान्य विवाह प्रोत्साबन योजनेत बदल केला आहे. या योजनेतील रक्कम वाढवून देण्यात आली आहे. याबाबतचे निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने जारी केले आहे.

शासन निर्णयानुसार, वधू आणि वर यांच्यांकडे दिव्यांग (scheme)असण्याचे UDID कार्ड असणे गरजेचे आहे.दिव्यांग वर किंवा वधूपैकी एकजण महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. या दोघांचेही आधी लग्न झालेले नसावे. लग्नाचे रजिस्ट्रेशन असावे. लग्नानंतर एका वर्षात या योजनेसाठी अर्ज करु शकतात. ही कागदपत्रे तुम्ही जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जमा करु शकतात.
हेही वाचा :
वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक