सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता नवीन कायद्यानुसार महागाई भत्ता मिळणार नाही(employees)असा दावा करण्यात आलाय…तसा मेसेज व्हायरल करण्यात आलाय…पण, खरंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हा नवीन कायदा बनवण्यात आलाय का…? कारण, देशभरात लाखो सेवानिवृत्त कर्मचारी आहेत…त्यामुळे याची सत्यता जाणून घेऊन ती सांगणं गरजेचं आहे…जर नियमांत बदल केलाय तर का केलाय…? याची माहिती सांगण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली…

केंद्र सरकारने अर्थसंकल्प कायदा 2025 अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ (employees)आणि वेतन आयोगातील सुधारणांसारखे सेवानिवृत्तीनंतरचे फायदे मागे घेतलेत.हा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय…त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांकडून माहिती मिळवली…तसंच सरकारने नवीन कायदा बनवलाय का…? याचीही माहिती मिळवली…
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई (employees)भत्ता बंद केलेला नाही
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ सुरूच आहेत
CCS पेन्शन 2021 च्या नियम 37 मध्ये सुधारणा
गैरवर्तनामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांचे निवृत्ती लाभ बंद होतात

CCS पेन्शन नियम, 2021 मधील नियम 37 मध्ये सुधारणा करण्यात आलीय…(employees)सरकारी विभाग सार्वजनिक उपक्रमात रूपांतरित झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि निवृत्ती वेतनाशी संबंधित तरतुदींशी संबंधित आहे…ज्या कर्मचाऱ्यांना गैरवर्तनामुळे सेवेतून काढले जाते, तेव्हा त्यांच्या सरकारी सेवेतील लाभांवर परिणाम होतो…मे 2025 मध्ये यात सुधारणा करण्यात आलीय…मात्र, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बंद करणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय..
हेही वाचा :
कमी पाणी पिणाऱ्यांचा मेंदू होतोय हळूहळू छोटा; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर
रोजगा हमी योजनेतून गांधींचं नाव हटवणार
सुप्रिया सुळे आता प्रफुल्ल पटेल अमित शहांच्या भेटीला, दिल्लीत काय घडतंय?