बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकताच पाटणा येथे आयुष डॉक्टरांना नियुक्ती (woman’s)पत्र देताना एका महिला डॉक्टरचा बुरखा ओढला. ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे… व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी देखील नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे… काँग्रेस नेत्याने तर नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे पूर्व अभिनेत्री झायरा वसिम हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आणि नितीश कुमार यांनी त्या महिलेची माफी मागावी अशी मागणी केली आहे… याप्रकरणामुळे सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे…

सांगायचं झालं तर, झायरा आता इंडस्ट्रीपासून दूर असली तरी, (woman’s)महत्त्वाच्या आणि वादग्रस्त मुद्द्यांवर व्यक्त होताना दिसते… आता देखील झायरा मुस्लीम महिलेच्या बाजून उभी आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एका मुस्लिम महिलेचा बुरखा ओढताना पाहून ती संतापली. तिने नितीश कुमार यांच्याकडून माफीची मागणी केली….झायरा हिने एक्सवर एक पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. ‘महिलांची प्रतिष्ठा आणि मर्यादा काही खेळ नाही… ज्यासोबत सहज कोणाला खेळता येईल… विशेषतः सार्वजनिक मंचावर तर बिलकूल नाही… एक मुस्लिम महिला म्हणून, दुसऱ्या महिलेचा बुरखा इतक्या सहजपणे ओढलेला आणि त्याकडे हास्यासह पाहणे खूपच संतापजनक होतं. सत्ता मर्यादेचं उल्लंघन करण्याची परवानगी कधीच देत नाही…. नितीश कुमार यांनी त्या महिले माफी मागायला हवी..’ असं देखील झायरा पोस्टमध्ये म्हटली आहे.

15 डिसेंबर रोजी, जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्रे देत होते, (woman’s)तेव्हा त्यांनी त्यापैकी एका नुसरत नावाच्या महिला डॉक्टरचा बुरखा ओढला. सुरुवातील त्यांनी महिलेला विचारलं हे काय आहे. यावर महिला म्हणाली बुरखा आहे… तेव्हा नितीश कुमार म्हणाले, त्याला हटव… असं म्हणत नितीश कुमार यांनी स्वतः महिलेचा बुरखा ओढला. एवढंच नाही तर, ते हसू देखील लागले आणि त्यांच्यासोबत मंचावर उपस्थित इतर लोकं देखील हसू लागल्याने संतापाची लाट उसळली… या प्रकरणानंतर नितीश कुमार यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे

हेही वाचा :

जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा

‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे

बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचाEditEdit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *