वर्षाचा शेवटचा महिना सुरु आहे. त्यामुळे आपण सध्या पैशाचे नियोजन करण्याचा विचार करत असतो.(closed) अशावेळी बँकेत जाऊन आपण आपले व्यवहार करत असतो. त्यामुळेजर तुम्ही येत्या काही दिवसांत बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. डिसेंबर महिन्याच्या उरलेल्या दिवसांत वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेत जाण्याआधी तुमच्या शहरातील बँक सुट्ट्यांची यादी एकदा नक्की तपासा अन्यथा तुमचा बिनकामाचा वेळ वाया जाऊ शकतो.

आजपासून म्हणजेच 18 डिसेंबरपासून काही राज्यांमध्ये सलग ५ दिवस बँका बंद राहणार आहेत.(closed) यात राज्यांनुसार आणि स्थानिक सणांनुसार सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे तुमच्या खात्रीसाठी जवळच्या बँक शाखेकडून सुट्ट्यांची माहिती आधीच जाणून घेणं योग्य ठरेल.

आजपासून कुठे-कुठे बँका बंद?
18 डिसेंबर गुरुवार
मेघालय आणि छत्तीसगडमध्ये बँका बंद राहतील.
मेघालय राज्यात यू सोसो थम यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुट्टी असणार आहे.
छत्तीसगडमध्ये गुरु घासीदास जयंतीनिमित्त बँका बंद असणार आहे.
या दोन राज्यांव्यतिरिक्त देशात इतर ठिकाणी बँका सुरू असतील.

19 डिसेंबर शुक्रवार
गोव्यात गोवा स्वातंत्र्य दिवसानिमित्त सर्व सरकारी व खासगी बँका बंद राहतील. मात्र या दरम्यान ऑनलाइन बँकिंग सुरू राहील.

20 डिसेंबर शनिवार
सिक्कीममध्ये स्थानिक लोसूंग आणि नामसूंग सणामुळे बँका बंद राहणार आहे.

21 डिसेंबर रविवार
देशभरातील सर्व बँका साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने बंद राहतील.

22 डिसेंबर सोमवार
सिक्कीममध्ये पुन्हा लोसूंग आणि नामसूंग सणामुळे बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे सिक्कीममध्ये २०-२२ डिसेंबर असे सलग तीन दिवस बँक सेवा बंद राहील.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील बँक सुट्ट्या
24 डिसेंबर बुधवार
नागालँड, मेघालय आणि मिझोरम राज्यांमध्ये(closed) ख्रिसमस ईव सणानिमित्त बंद बंद राहतील.

25 डिसेंबर गुरुवार
देशभरात ख्रिसमस चा सण असल्याने सर्व बँका बंद राहतील.

26 डिसेंबर शुक्रवार

नागालैंड, मेघालय आणि मिजोरम या ईशान्य राज्यांमध्ये ख्रिसमसची सुट्टी २६ तारखेला देखील असणार आहे.

27 डिसेंबर शनिवार
चौथा शनिवार असल्याने बँक बंद राहतील.

28 डिसेंबर रविवार
रविवार असल्याने सर्व बँकांना साप्ताहिक सुट्टी असणार आहे.

30 डिसेंबर मंगळवार
मेघालय राज्यात स्वातंत्र्यसैनिक यू कियांग नांगबह यांच्या पुण्यतिथीमुळे बँकांना सुट्टी राहील.

31 डिसेंबर बुधवार
मिझोरम आणि मणिपूर या ईशान्य राज्यांत न्यू इयर ईव व इमोइनु इराटपा सण असल्याने बँकाना सुट्टी असणार आहे.

महाराष्ट्रातील बँका कधी बंद राहणार
21 डिसेंबर, 25 डिसेंबर, 27 डिसेंबर आणि 28 डिसेंबर या चार दिवस राज्यातील बँका बंद असणार आहेत. त्यामुळे बँकेतील आपले व्यवहार सुट्टीच्या आधीच पूर्ण करून घ्या.

या सेवा मात्र सुरू राहतील
ऑनलाइन बँकिंग सुरु राहील. त्यामुळे इंटरनेट व मोबाईल अ‍ॅपवर (closed) व्यवहार करता येतील.ATM आणि UPI सुरू असणार त्यामुळे डिजिटल पेमेंट्स सुरू राहतील.NEFT आणि RTGS सुविधा सुरू राहतील मात्र बँक सुट्टीच्या दिवशी व्यवहार करताना थोडा उशीर होऊ शकतो.

हेही वाचा :

आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून CNG आणि PNG च्या किमती कमी होणार

नवऱ्याने मर्यादा सोडली, गर्भवती बायकोला दारु पाजली आणि नंतर मित्रांना…धक्कादायक घटना

मोठी बातमी! धनंजय मुंडे भाजपात प्रवेश करणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *