सध्या जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत.(unfolding)प्रत्येक देश आपल्या व्यापाराचा विस्तार कसा होईल? जगभरातून देशात कशी गुंतवणूक येईल? यासाठी प्रयत्न करत आहे. सोबतच आपल्या देशाची सुरक्षा अबाधित राहावी यासाठीदेखील अनेक देश लष्कराला बळ पुरवत आहेत. आपल्या सोईच्या देशांसोबत अनेक देश संरक्षणविषयक करार घडवून आणत आहेत. असे असतानाच आता भारताची चिंता वाढवणारी एक बाब समोर आली आहे. पाकिस्तान एक मोठा सैन्यविषयक करार घडवून आणत असून याचा भारताला भविष्यात फटका बसू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात (unfolding)एक महत्त्वाचा संरक्षणविषयक करार होणार आहे. त्या दिशेने दोन्ही देश पावलं टाकत आहेत. या संरक्षण कराराअंतर्गत दोन्ही देश एकमेकांना लष्करी पातळीवर सहकार्य करण्यास वेगळी दिशा मिळणार आहे. सध्यातरी दोन्ही देश या करारावर चर्चा करत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय आणि लष्करी अधिकारी बांगलादेशच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर आता या दोन्ही देशांत संरक्षण करार होत असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या जरी पाकिस्तान (unfolding)आणि बांगलादेश यांच्यात संरक्षणविषय करार होत असला तरी सध्यातरी या कराराला प्रत्यक्ष रुप मिळण्याची शक्यता कमी आहे. लवकराच बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ही निवडणूक झाल्यानंतर तिथे नव्या सरकारची स्थापना होईल. त्यानंतरच पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील कराराला अंतिम स्वरुप मिळू शकते. हा करार अस्तित्त्वात आला तर पाकिस्तानचे बळ वाढू शकते. तसेच पाकिस्तानचे बळ वाढले तर त्याचा फटका भारताला बसू शकतो. त्यामुळे भविष्यात नेमके काय काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक