देशात सध्या थंडीचे प्रमाण खूप जास्त वाढत आहे. त्यात दिल्लीमध्ये वायू प्रदुषणाचीही समस्या आहे.(holiday)जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाबमध्ये तर उणे तापमान आहे. त्यामुळे या प्रदेशात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याचसोबत सध्या ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त शाळा बंद असणार आहे. अनेक राज्यांमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शाळा जवळपास १० ते १५ दिवस बंद असणार आहे.

दिल्लीत १० ते १५ दिवस शाळा बंद
दिल्लीत खूप जास्त वायूप्रदुषण होत आहे. यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (holiday)शाळांना २३ डिसेंबरपासून ते १ जानेवारीपर्यंत शाळा बंद असणार आहेत. त्यानंतर पुन्हा ३ आणि ४ जानेवारीला शाळांना सुट्टी असणार आहे. दिल्लीसह नोएडा, फरीदाबाद, गुरुग्राम येथेही शाळा बंद असणार आहे.
हरियाणात शाळांना सुट्टी
हरियाणात थंडीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या राज्यात १ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत थंडीमुळे सुट्टी दिली जाऊ शकते. त्यानंतर पुन्हा २५,२६, २७ डिसेंबरला शाळांना सुट्टी असणार आहे.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशमध्ये खूप जास्त थंडी आहे. यामुळे अनेक जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. गाझियाबादमध्ये १ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद असणार आहे.
बिहार
बिहारमध्येही अनेक जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. थंड प्रदेशात पटना, मुजफ्फरपुर, अररिया, बांका या ठिकाणी शाळेची वेळ ९.३० ते ४ वाजेपर्यंत शाळा असणार आहे.

पंजाब
पंजाबमध्ये सर्वात जास्त थंडी आहे. यामुळे २४ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत (holiday)शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा शनिवार, रविवार आल्याने शाळा थेट ५ जानेवारीला सुरु होऊ शकतात.
हेही वाचा :
वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक