रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. तुम्हालाही रेल्वेत नोकरी करायची(Recruitment)असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेच्या ग्रुप डीसाठी २२००० पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.रेल्वेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २१ जानेवारी २०२६ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. सध्या फक्त अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्जप्रक्रिया लवकरच सुरु होईल.

ग्रुप डीमध्ये सर्वाधिक पदे ही ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV साठी आहेत.(Recruitment) या पदासाठी एकूण ११,००० जागा रिक्त आहेत. यानंतर प्वॉइंट्समॅन, असिस्टंट पदावर भरती होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करु शकतात.रेल्वेत असिस्टंट ट्रॅक मशीन, असिस्टंट ब्रिज, ट्रॅक मॅनेजर, असिस्टंट पी-वे, असिस्टंट टीआरडी, असिस्टंट लोको शेड, असिस्टंट ऑपरेशन्स, पॉइंट्समॅन बी पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

रेल्वेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा,(Recruitment) फिजिकल एफिशिएंसी टेस्ट, कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल टेस्टद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर सुरुवातीला १८००० रुपये पगार मिळणार आहे.रेल्वेतील ग्रुप डी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित क्षेत्रात आयटीआय केलेले असावे.याबाबतची सविस्तर माहिती अधिसूचनेत दिली आहे. याबाबत अर्जप्रक्रिया जानेवारीत सुरु होईल.
हेही वाचा :
या राज्यातील शाळांना १०-१५ दिवस सुट्टी; महाराष्ट्रात काय
सोहम बांदेकरवर लग्नानंतर काही दिवसातच कोसळला दुःखाचा
WhatsApp वर तुम्हाला कोणी केलंय Block? ‘या’ ट्रिकने लगेच