भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज शफाली वर्मा हिने (setback) श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 मॅचमध्ये स्फोटक फलंदाजी केली. तिने फक्त 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी 129 धावांचे लक्ष्य ठेवले होते. शेफालीने 34 चेंडूत नाबाद 69 धावा करताना 11 चौकार आणि 1 षटकार ठोकला. या तूफान खेळीमुळे भारताने अवघ्या 12 व्या षटकात सामना जिंकला आणि शेफालीला तिच्या कामगिरीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.शफाली वर्माचा हा भारतासाठी खेळलेला 92 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. 8 व्यांदा तिने प्लेअर ऑफ द मॅच म्हणून पुरस्कार जिंकला. यासह तिने स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्स हिला मागे टाकलं आहे. त्या दोघींनी प्रत्येकी 7 वेळा प्लेअर ऑप द मॅचचा पुरस्कार जिंकला आहे. स्मृतीने 155 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार मिळवण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर आहे, तिने 12 वेळा पुरस्कार जिंकला असून 11 पुसर्कारांसह हरमनप्रीत कौर दुसऱ्या स्थानी आहे.

मिताली राज- 12
हरमनप्रीत (setback)कौर- 11
शेफाली वर्मा- 8
स्मृति मानधना – 7
जेमिमा रोड्रिग्स- 7

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. (setback)नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेने 9 विकेट्स गमावून 128 धावा केल्या. श्रीलंकेसाठी हर्षिता समरविक्रमाने सर्वाधिक 33 धावा केल्या, तर कर्णधार चमारी अथापथूने 31 धावा केल्या. हसिनी परेराने 22 धावा केल्या. भारताकडून वैष्णवी शर्मा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2, तर क्रांती गौर आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 1 विकेट टिपली.प्रत्युत्तरादाखल भारताने अवघ्या 11.5 षटकांत सामना जिंकला. 21 वर्षीय शफाली वर्माने 34 चेंडूत एक षटकार आणि 11 चौकारांसह 69 धावा केल्या. दरम्यान, जेमिमा रॉड्रिग्जने 26 केल्या. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पुढील सामना 26 डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळला जाईल.

हेही वाचा :

वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत

‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई

चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *