बॉलिवूडमधील अजरामर चित्रपटांची चर्चा झाली की संजय लीला भन्साळी यांचा (dispute) देवदास’ हा चित्रपट आवर्जून आठवतो. 2002 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.भव्य सेट्स, संगीत आणि भावनिक दृश्यांमुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. मात्र या चित्रपटातील एका अतिशय रोमँटिक आणि आयकॉनिक दृश्यामागे दडलेली गोष्ट फारच धक्कादायक आहे. या दृश्यात प्रत्यक्षात शाहरुख खान नव्हे तर सलमान खान होता, हे फार कमी लोकांना माहीत आहे.प्रसिद्ध चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांनी आपल्या ‘किंग ऑफ बॉलिवूड: शाहरुख खान अँड द सिडक्टिव वर्ल्ड ऑफ इंडियन सिनेमा’ या पुस्तकात या घटनेचा खुलासा केला आहे. त्या काळात सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे नाते बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत होते. ‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवर सुरू झालेली ही प्रेमकहाणी ‘देवदास’च्या शूटिंगपर्यंत येईपर्यंत तणाव, वाद आणि ब्रेकअपच्या टप्प्यावर पोहोचला होता. दोघांमधील संवाद जवळपास बंद झाला होता.

योगायोग असा की सलमान खान हे संजय लीला भन्साळी यांचे (dispute)अत्यंत जवळचे मित्र होते आणि ते अनेकदा ‘देवदास’च्या सेटवर उपस्थित राहत असत. ज्या दिवशी ‘मोरे पिया’ गाण्यातील काटा काढण्याच्या दृश्याचे शूटिंग होते त्या दिवशी सलमान सेटवरच होता. शाहरुख आणि ऐश्वर्या त्या सीनची तयारी करत असताना सलमान स्वतःला थांबवू शकला नाही. त्याने शाहरुखला हा सीन अधिक प्रभावी कसा होईल याबद्दल सूचना देण्यास सुरुवात केली.

सलमान पुढे गेला आणि स्वतःच ऐश्वर्याच्या पायाजवळ वाकून काटा काढण्याचा डेमो दाखवू लागला. (dispute)कलाकारांच्या भावना आणि क्षण टिपण्यात माहिर असलेल्या भन्साळींनी लगेचच ही संधी ओळखली आणि कॅमेरा रोल करण्याचे आदेश दिले. तो शॉट इतका नैसर्गिक आणि भावपूर्ण होता की भन्साळींनी तोच फाइनल कटमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला.या सीनमध्ये फक्त हात आणि पायाचा क्लोज-अप असल्याने कोणताही चेहरा दिसत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना आजवर कधीच कळले नाही की त्या रोमँटिक प्रसंगात देवदास म्हणून दिसणारा हात शाहरुख खानचा नसून सलमान खानचा होता. तांत्रिकदृष्ट्या पाहिले तर हा ‘मोरे पिया’मधील प्रसंग सलमान आणि ऐश्वर्या एकाच फ्रेममध्ये एकत्र रेकॉर्ड झालेले शेवटचा क्षण ठरला.

हेही वाचा :

पार्टी ऑल नाईट! 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत

१ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते

घराच्या बाल्कनी आणि गॅलरीत कबुतरं येऊ नयेत यासाठी सोपे, मुघल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *