कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

नेत्यांच्या मुलांनी राजकारणात येऊ नये असे कोणीही म्हणणार नाही,(children)पण निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांनी आपल्याच मुलांना राजकारणात लॉन्च करणार हे सुद्धा बरोबर नाही.सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आणि नेत्यांनी आपल्याच घरात उमेदवारी आणली आहे. कोल्हापूर सह राज्यात अशा प्रकारे घराणेशाहीच चित्र सध्या दिसू लागल आहे.भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे आपले चिरंजीव कृष्णराज यांना प्रभाग क्रमांक तीन मधून महापालिकेच्या आखाड्यात आणणार आहेत. कोल्हापूर उत्तर च्या माजी आमदार श्रीमती ‌जयश्री जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव हे निवडणुकीत उतरले आहेत तर कोल्हापूर उत्तरचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांचे चिरंजीव ऋतुराज प्रभाग क्रमांक सात मधून निवडणुकीस उभा केले आहेआणि त्यांचा प्रचारही जोरात सुरू आहे.

त्यांना आपल्या चिरंजीवांना कोल्हापूरचे महापौर बनवायचे आहे.(children) माजी महापौर हसीना पारस आणि त्यांचे चिरंजीव अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास प्रभाग क्रमांक 12 मधून महायुतीचे उमेदवार आहेत. महापालिकेच्या अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी कुणी आपली कन्या, तर कोणी बहीण तर कोणी पत्नी यांना कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत उतरवले आहे. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका. छोट्या राज्या एवढे तिचे वार्षिक बजेट असते. मुंबईचा नगरसेवक म्हणजे आमदारच. मुंबईतील विद्यमान आमदार, माजी आमदार, विद्यमान खासदार, माजी खासदार यांनी आपल्याच घरात उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी फिल्डिंग लावलेली आहे. सुनील प्रभू, सचिन अहिर, आशिष शेलार, यांच्यासह अनेकांनी आपल्या घरातील सदस्यांसाठी उमेदवारी मागितली आहे.

कोणत्याही प्रसंगात आपल्या अवतीभवती असलेल्या कार्यकर्त्यांना (children)उमेदवारी मिळावी यासाठी आजी-माजी लोकप्रतिनिधींनी फिल्डिंग लावलेली आहे हे चित्र फारच दुर्मिळ आहे. कार्यकर्त्यांनी नेत्यांबरोबर मोर्चात सामील व्हायचे, प्रचार सभांना हजेरी लावायची, तोडफोड करायची अंगावर खटले घ्यायचे, आणि कोर्टात चकरा मारायच्या. नेत्यांच्या मुलांवर राजकीय आंदोलनात्मक गुन्हे दाखल आहेत, त्यांना अटक झाली आहे हे सुद्धा दुर्मिळ चित्र आहे. कार्यकर्त्यांनी “विजयी असो “च्या घोषणा द्यायच्या.त्यांनी ग्रामपंचायत सदस्य होण्याचे, जिल्हा परिषदेमध्ये जायचे, नगरपालिका, नगरपरिषदा किंवा इतर तत्सम संस्थांमध्ये सदस्य होण्याचे आणि त्यासाठी निवडणूक लढवण्याचे स्वप्न बघायचे नाही. त्यांनी फक्त घराणे शाही चे स्वागत करायचे. एकूणच घराणेशाहीच्या नावानं चांगभलं असंच कोल्हापुरात आणि इतरत्र चित्र आहे.

राज्य शासनाची महामंडळे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, एस टी महामंडळ, नियोजन मंडळ, जिल्हा नियोजन मंडळे, राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्या समित्यांवरील अध्यक्षपद, सिद्धी विनायक मंदिर ट्रस्ट,पंढरपूर देवस्थान समिती, शिर्डी संस्थान समिती, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती या ठिकाणी सर्व सामान्य कार्यकर्ता दिसणार नाही. मंत्री, आमदार, खासदार यांच्याच घरात या संस्था आहेत. या संस्थांचे सदस्य किंवा संचालक होण्याचे स्वप्न सामान्य कार्यकर्त्याने बघताच कामा नये इतक्या महाग निवडणुकाया नेत्यांनीच करून ठेवल्या आहेत.

हेही वाचा :

या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते

सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *