इचलकरंजी महापालिका निवडणुकीत तिसऱ्या दिवशीही उमेदवारी (nominations) अर्ज दाखल होण्यास गती नाही; मात्र उमेदवार अर्ज घेण्यासाठी चारही प्रभाग कार्यालयात गर्दी आजही तुफान होती. आज एकूण ३२३ अर्ज विक्रीस आले असून, मागील तीन दिवसांत ६८६ अर्ज इच्छुकांनी घेतले आहेत.

अद्याप कोणत्याही पक्षाने उमेदवार यादी जाहीर केलेली नसल्यामुळे(nominations) अर्ज दाखल करण्यास विलंब होत आहे. भाजपची उमेदवारी यादी उद्या जाहीर होण्याची अपेक्षा असून, यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गती येईल.

निवडणूक विभागाचे कामकाज उद्या सुरु राहणार असल्याने इच्छुक (nominations) उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची संधी मिळणार आहे. अर्ज घेण्यासाठी प्रभाग कार्यालयांमध्ये उमेदवारांची तुफान गर्दी आजही पाहायला मिळाली, त्यामुळे निवडणूक रणधुमाळीची नांदी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका