निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महापालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडली (proved) असून, अवघ्या पंधरा दिवसांत घरफाळा आणि पाणीपट्टीपोटी तब्बल दोन कोटी ८६ लाख रुपयांची वसुली झाली आहे. महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसह सूचक आणि अनुमोदक यांच्यावर कोणतीही थकबाकी नसणे आवश्यक असल्याने, इच्छुकांनी वेळेत देणी भरून ‘ना हरकत’ दाखला मिळविण्यासाठी महापालिकेकडे धाव घेतली.

गेल्या पंधरा दिवसांत महापालिकेच्या घरफाळा विभागात मोठी गर्दी पाहायला मिळाली. (proved)उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून एकूण १४५३ ‘ना हरकत’ दाखले घेण्यात आले. या प्रक्रियेतून घरफाळ्यापोटी सुमारे दोन कोटी ४४ लाख रुपये, तर पाणीपट्टीपोटी ४२ लाख ५० हजार रुपयांची वसुली झाली. निवडणुकीच्या निमित्ताने थकबाकीदारांनीही आपली देणी भरण्यास प्राधान्य दिल्याचे चित्र स्पष्ट झाले.शहरातील काही मालमत्तांवर अनियमित बांधकामामुळे आकारलेली शास्ती अनेकांनी आज ना उद्या माफ होईल, या अपेक्षेने भरलेली नव्हती. मात्र निवडणूक लढविताना घरफाळ्याची कोणतीही थकबाकी नसावी, ही अट लक्षात आल्यानंतर अशा मिळकतधारकांनी शास्तीची रक्कमही भरल्याने महापालिकेला अतिरिक्त महसूल मिळाला.

दरम्यान, मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने महापालिकेने (proved)मतदारांसाठी तक्रार निवारण व मदत कक्ष सुरू केला आहे. महापालिका इमारतीसमोर सुरू करण्यात आलेल्या या केंद्रातून मतदारांच्या तक्रारींची दखल घेतली जात असून आवश्यक माहितीही दिली जात आहे. दररोज सुमारे तीस ते चाळीस मतदार या सुविधेचा लाभ घेत असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.

हेही वाचा :

नोकरीला कंटाळलात? 2026 मध्ये पैसे कमावण्याच्या या आहेत 5 बेस्ट आयडिया

२०२६ मध्ये मोठे आर्थिक संकट? बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांनी जगभरात माजली

Sangli Crime: कॉलेजसमोरुन निघाला, चौघांनी अडवलं अन्… सांगलीत 22

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *