उत्तर प्रदेशमधील भाजपचे नेते आणि माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (climbing) स्टेजवरच तोंडावर पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ राष्ट्रकथा या कार्यक्रमावेळचा असल्याचे समोर आलेय. भाजप नेते ब्रिजभूष हे राष्ट्रकथा कार्यक्रमासाठी स्टेजवर जात होते. त्यांच्यासोबत काही इतर नेतेही उपस्थित होते. त्यावेळी अचानक त्यांचा तोल गेला अन् ते जमिनीवर पडल्याचे व्हिडिओत दिसतेय. या दुर्घटनेत सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. तोल गेल्यामुळे पडलेले बृजभूषण यांनी स्वत:ला सावरले अन् हसत हसत उभे राहिले. आजूबाजूच्या लोकांनीही त्यांना उठण्यासाठी मदत केली.

ब्रिजभूषण शरण सिंह यांचा ८ जानेवारी रोजी ६९ वा वाढदिवस होता. (climbing)कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. यानिमित्त गोंडा जिल्ह्यातील नंदनी नगर येथे “राष्ट्रकथा” नावाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान ब्रिजभूषण स्टेजवर असताना हा किरकोळ अपघात झाला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झालाय. ब्रिजभूषण यांचा स्टेजवर कोसळतानाचा व्हिडिओ क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर कमेंटचा पाऊस पडलाय. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतेय की स्टेजवर अनेक लोक होते आणि खाली मोठ्या संख्येने लोक बसले होते. ब्रिजभूषण पडताच, जवळचे लोक लगेच त्यांच्या मदतीला धावले. काही सेकंदातच ते पुन्हा हसत हसत उभे राहिल्याचे दिसतेय.
ब्रिजभूषण यांच्या वाढदिवसानिमित्त आठ दिवसांच्या राष्ट्रीय कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. (climbing)या कार्यक्रमासाठी संत रितेश्वर महाराजांना आमंत्रित करण्यात आले. ८ जानेवारी रोजी कथेचा शेवटचा दिवस होता, त्याच दिवशी ब्रिजभूषण शरण सिंह यांचा वाढदिवस होता. त्यामुळे हा कार्यक्रम आणखी खास बनला. त्यांना वाढदिवसाची एक अतिशय खास आणि महागडी भेट देखील मिळाली. लंडनहून आलेल्या एका पाहुण्याने त्यांना एक चॅम्पियन घोडा भेट दिला. त्या घोड्याची किंमत अंदाजे ₹२.५ कोटी अंदाजे $२५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे.
हेही वाचा :
आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद
इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा