स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. (Withdrawing) स्टेट बँकेच्या ग्राहकांच्या खिशाला आता फटका बसणार आहे. स्टेट बँकेने आपल्या ATM ट्रान्झॅक्शनवरील चार्ज वाढवले आहेत. यामुळे आता एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत. यामुळेच सर्वसामान्यांना फटका बसणार आहे.स्टेट बँकेने याआधी १ फेब्रुवारी २०२५ मध्ये एटीएम कार्डच्या चार्जेसमध्ये बदल केला होता. त्यानंतर वर्षभरातनंतर पुन्हा एकदा ट्रान्झॅक्शन फीमध्ये बदल केला आहे. बँकेच्या म्हणण्यांनुसार इंटरचेंज फी वाढल्यामुळे हे चार्जेसदेखील वाढले आहे. यामध्ये ऑटोमेडेट टेलर मशीन म्हणजे एटीएम आणि विड्रॉल मशीनच्या ट्रान्झॅक्शनच्या सर्व्हिस चार्जमध्ये वाढ करण्यात आली आहे.

जर सेव्हिंग अकाउंट असेल तर त्यासाठी एटीएममधून पैसे काढण्यासाठी (Withdrawing) अनलिमिटेड फ्री ट्रान्झॅक्शन मिळत होते. मात्र आता ही लिमिट महिन्याला १० ट्रान्झॅक्शन करण्यात आली आहे. यानंतर १० ट्रान्झॅक्शनची लिमिट ओलांडल्यानंतर तु्म्हाला २३ रुपये आणि जीएसटी द्यावा लागणार आहे. पहिल्या महिन्यात हे मोफत असणार आहे. नॉन फायनान्शियर ट्रान्झॅक्शनवर ११ रुपये आणि जीएसटी लागणार आहे.

स्टेट बँकेने सांगितले की, याआधी १ फेब्रुवारी २०२५ मध्ये शेवटचे (Withdrawing) ट्रान्झॅक्शन सर्व्हिस चार्ज रिवाइज केले होते. यानंतर आता ATM/ADWM साठी इंटरचेंज फीमध्ये वाढ करण्यात आली आहे. हे नवीन चार्ज १ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार आहेत. यामध्ये नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन १० रुपयांवरुन ११ रुपये आणि जीएसटी करण्यात आले आहेत.यामध्ये १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा :
DMart संक्रांती सेल! स्टील भांडी फक्त 29 रुपयांपासून
बेफाम दारू प्यायला अन् बार गर्लवर पैसे उधळले; नवी मुंबईतील पोलिसाचा
ITR च्या रिफंडसाठी एक वर्षापर्यंत पाहावी लागेल वाट