भारतात मागील दशकानुदशकं काही कार कंपन्या या दर्जेदार (discounts) कारचे मॉडेल सादर करत आणि याच माध्यमातून ग्राहकांच्या मनातील विश्वासार्हतेत भर टाकताना दिसत आहेत. अशा या नामांकित कार कंपन्यांमध्ये येणाऱ्या काही नावांच्या यादीत हमखास उल्लेख होतो तो म्हणजे टाटा मोटर्स या कार कंपनीचा. अशी ही कार कंपनी नव्या वर्षाच्या निमित्तानं कार खरेदी करू पाहणाऱ्यांसाठी जणू आनंद आणि सवलतींचा पेटाराच उघडण्यास सज्ज झाली असून जानेवारी 2026 साठी कंपनीनं लोकप्रिय ICE पेट्रोल, डीजल आणि सीएनजी कारच्या दरात मोठी घट होणार असल्याची घोषणा केली आहे. जानेवारी 2026 मध्ये टाटा मोटर्सकडून काही निवडक कारवर तब्बल 85000 रुपयांपर्यंतची घसघशीत सवलत दिली जाणार आहे.

ही सवलत जानेवारी 31 पर्यंत वैध राहणार आहे.(discounts) कंपनीकडून या सवलतीअंतर्गत कंझ्यूमर डिस्काऊंटस एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज बोनस आणि कॉरपोरेट डिस्काउंटचा लाभ घेण्याची मुभा असेल. MY24 2024 मॉडल आणि MY25 2025 मॉडल या दोन्ही इन्वेन्ट्रीवर ही सवलत लागू असेल. टाटाच्या Tiago, Tigor या कारच्या 2024- 25 मधील मॉडेलवर 35000 रुपयांची सवलत असून, फक्त टियागोचं बेस व्हेरिएंट यातून वगळम्यात आलं आहे. भारतातील लोकप्रिय एसयुव्ही असणाऱ्या टाटा पंचवर 40000 रुपयांची सवलत मिळत असून, टाटा नेक्सॉनच्या पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी व्हेरिएंटवर फ्लॅट 50000 रुपयांची सवलतही ग्राहकांना मिळू शकते. हल्लीच लाँच झालेल्या टाटा कर्व्ह या कारवरही कंपनी 40000 रुपयांची सवलत देत आहे. ज्यामध्ये लॉयल्टी बोनसमुळं ग्राहकांचा फायदाच होत आहे.

टाटाच्या Harrier आणि Safari या प्रिमीयम एसयुव्ही श्रेणीतील कारवर (discounts) कंपनी 75000 रुपयांपर्यंतची सवलत देत असून, यामध्ये 25000 रुपयांची कॅश ऑफर आणि 50000 रुपयांचा एक्सचेंज/स्क्रॅपेज बोनस समाविष्ट आहे. याशिवाय एसबीआय योनो आणि विशेष कॉर्पोरेट योजनांअंतर्गतही ग्राहकांना चांगली बचत करता येणार आहे. टायाच्या या सर्व सवलतींमध्ये सर्वाधिक फायदा करून देणारी कार म्हणजे Tata Altroz प्री-फेसलिफ्ट. या कारवर तब्बल 85000 रुपयांची सवलत मिळत असून त्यात 60000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि 25000 रुपयांचा एक्सचेंज बोनसही मिळत आहे. इतकंच नव्हे, तर हल्लीच लाँच झालेल्या फेसलिफ्ट अल्ट्रोजवरही कंपनी सवलत देत आहे. त्यामुळं कार खरेदीचा विचार असेल तर टाटाची कार निवडणं हा फायद्याचा निर्णय ठरेल असं म्हणणं अतिशयोक्ती नाही.
हेही वाचा :
आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद
इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा