इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत (contest) आज मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर शिव-शाहू विकास आघाडीनेही दमदार कामगिरी करत चार उमेदवार विजयी केले आहेत. त्यामुळे इचलकरंजीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.2025 मध्ये महानगरपालिका दर्जा मिळाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. 16 प्रभागांतील 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात होते. गुरुवारी पार पडलेल्या मतदानात तब्बल 70 टक्के मतदान झाले होते. महायुती आणि शिव-शाहू विकास आघाडी यांच्यात थेट लढत रंगली होती.

सुरुवातीच्या निकालांमध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी झाले (contest) असून वॉर्ड क्रमांक 4 मध्ये भाजपच्या चारही उमेदवारांनी 1200 ते 1400 मतांच्या फरकाने आघाडी घेतली आहे. यामुळे महायुतीला सुरुवातीपासूनच मजबूत सुरुवात मिळाली आहे. भाजपने यावेळी संघटनात्मक ताकद आणि स्थानिक मुद्द्यांवर आधारित प्रचार करत मतदारांना आकर्षित केले होते.त्याचवेळी शिव-शाहू विकास आघाडीनेही प्रभावी कामगिरी करत वॉर्ड क्रमांक 7 मध्ये चार उमेदवार विजयी केले आहेत. काँग्रेस, ठाकरे गटाची शिवसेना आणि इतर मित्र पक्षांच्या एकत्रित ताकदीमुळे या आघाडीला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इचलकरंजीच्या राजकारणात आता त्रिकोणी समीकरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या निवडणुकीदरम्यान शहरातील पाणीटंचाई, वस्त्रोद्योगाचा विकास,(contest) रस्त्यांची दुरवस्था, गटारी आणि पाणीपुरवठा हे प्रमुख मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी होते. विशेषतः उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न मतदारांसाठी जिव्हाळ्याचा ठरला. अनेक उमेदवारांनी पाणीपुरवठ्याच्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते.त्याचबरोबर मतदार यादीतील गोंधळ, चार मते देण्याची प्रक्रिया आणि मतदान केंद्रांवरील विलंब या बाबींचीही चर्चा झाली. काही प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांचा प्रभाव दिसून आला, तर काही ठिकाणी माजी नगरसेवक आणि नातेवाईकांमधील थेट लढती रंगल्या. या सर्व घटकांचा अंतिम निकालांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निकालांमधून शहरातील बदलती राजकीय दिशा स्पष्ट होत असून पुढील काही तासांत संपूर्ण चित्र समोर येणार आहे. भाजप आणि शिव-शाहू विकास आघाडी यांच्यातील ही चुरशीची लढत शहराच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! जगात काहीतरी भयंकर घडणार; इराणचा भारताला फोन,

कुठे ईव्हीएम फोडले, तर कुठे उमेदवारांवर हल्ला; राज्यातील मतदानाला गालबोट

मासिक पाळीत पोटात दुखू लागलं, वेदनांनी १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *