जगात पुन्हा एकदा अण्वस्त्रांच्या सावटाचे गडद ढग(clouds) जमू लागले आहेत. तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढत असल्याच्या भीतीने पाश्चात्त्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिका आणि ब्रिटनमधील लाखो नागरिक आजपासूनच युद्ध, अणुहल्ला किंवा मोठ्या आपत्तींसाठी तयारी करत असल्याचे वृत्त Daily Mail आणि New York Post ने दिले आहे. युद्धाचे ढग अजून फक्त आकाशात आहेत, पण लोक मात्र जमिनीखाली उतरत आहेत.

ब्रिटनमधील अनेक लोक आपल्या घरांच्या तळघरात बंकर उभारू लागले आहेत. या बंकरमध्ये पाणी, औषधे आणि कॅन केलेले अन्नसाठे ठेवले जात आहेत. सर्वाधिक मागणी आहे ती २५ वर्ष टिकणाऱ्या मांसाच्या कॅनची. काही नामवंत व्यक्तिमत्त्वे देखील या गुप्त तयारीत सामील झाल्याचे वृत्त आहे.युद्ध, भूकंप, महामारी किंवा अणुहल्ला यांसारख्या आपत्तीपूर्वीच जी मंडळी पुरेपूर तयारी करून ठेवतात त्यांना ‘प्रीपर्स’ म्हटले जाते. ब्रिटनमध्ये या प्रीपर्सचे सोशल मीडिया ग्रुप झपाट्याने वाढत आहेत.
तब्बल २३ हजारांहून अधिक लोक असे ग्रुप जॉइन करून एकमेकांना टिप्स देत आहेत. हे लोक केवळ अन्नसाठा नाही, तर पोटॅशियम आयोडाइडच्या गोळ्याही मोठ्या प्रमाणावर गोळा करत आहेत. या गोळ्या रेडिएशन शोषून घेऊन थायरॉईड ग्रंथीचे संरक्षण करतात आणि अणुहल्ल्यानंतरही जगण्याची शक्यता वाढवतात.

अमेरिकेत परिस्थिती आणखी गंभीर भासत आहे. २०२३ मधील सर्वेक्षणानुसार, तब्बल २ कोटी नागरिक युद्धासाठी तयार आहेत, तर ५१ टक्के लोकांना अणुहल्ला किंवा मोठ्या विनाशाची शक्यता वाटते. अलीकडेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नानंतरही बंकर आणि सर्व्हायवल किटची मागणी प्रचंड वाढल्याचे द न्यू यॉर्करला सर्व्हायकल रिट्रीटचे संस्थापक ड्रू मिलर यांनी सांगितले.
स्मिथ नावाच्या एका तरुणाने सांगितले की, त्याने आपल्या बंकरमध्ये सोलर पॅनल, सॅटेलाइट फोन, सोलर क्रॅंक रेडिओ आणि वर्षभर पुरेल एवढा अन्नसाठा ठेवला आहे. त्याच्या मते, ही तयारी केवळ जागतिक युद्धासाठीच नव्हे तर अचानक नोकरी जाणे, नैसर्गिक आपत्ती किंवा दीर्घकालीन वीजपुरवठा खंडित होण्यासारख्या प्रसंगांसाठीही महत्त्वाची आहे.युक्रेन-रशिया युद्धानंतर जगात अण्वस्त्रांचा धोका अधिकच वाढला आहे.
रशियाच्या अण्वस्त्र साठ्याचे इशारे, मध्य पूर्वेतील अस्थिरता आणि पाश्चात्त्य देशांचे युद्धसज्ज हालचाली या सगळ्यांमुळे सामान्य नागरिकही अस्वस्थ झाले आहेत. परिणामी, युद्ध अजून सुरू झाले नसले तरी मानसिक महायुद्ध जगभर सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. आज परिस्थिती अशी आहे की, युद्ध कधी सुरू होईल हे कुणालाच माहीत नाही(clouds). पण जर ते सुरू झालेच, तर कमीत कमी अमेरिका आणि ब्रिटनमधील लाखो प्रीपर्स स्वतःसाठी जगण्याची तयारी आधीच करून बसलेले असतील.
हेही वाचा :
WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत!
आयटी कंपनीकडून 400 उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक
पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट, 2 हजार 481 कोटींच्या….