उपमुख्यमंत्री अजित पवारांचे काल विमान अपघातात निधन झाले.(information) अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, आता अजित पवारांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात काय बदल होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत. दरम्यान, आता काही दिवसातच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलतील, अशी चर्चा सुरु होती. मात्र, या चर्चांना पुर्णविराम लागला आहे.

कामाचा माणूस हरपला! अजित पवारांना पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला, (information) शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुका वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे निवडणुक आयोगातील सूत्रांनी सांगितले आहे.निवडणुकीच्या काळात राज्यात प्रमुख नेत्याचे निधन झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे निवडणूक रद्द करण्याबाबत कोणतेही आदेश निवडणूक नियमात नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे याचा निवडणुकीवर परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
निवडणुकीच्या प्रचाराच्या कालावधीत उमेदवाराचा मृत्यू झाल्यावर मतदारसंघातील निवडणूक स्थगित करण्याची प्रथा होती. मात्र, काही दिवसांनी यामध्ये बदल झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा परिषद निवडणुक होणार की नाही असा प्रश्न सर्वांच्या मनात आहेत.निवडणुक अधिनियमानुसार, मतदानाती तारीख ही निवडणूक आयोगच्या पूर्वपरवानगी किंवा सात दिवसाच्या आत बदलता येत नाही.
सार्वजनिक हित्या दृष्टीने निवडणूकीची तारीख बदलणे आवश्यक आहे,(information) असं जिल्हाधिकाऱ्यांचेमत असल्यास निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे पालन करुन असा बदल करता येतो.जर मतदानाच्या दिवशी शासकीय दुखवटा जाहीर केला असेल तर त्या काळात मतदानाची तारीख बदलली जाऊ शकते, अशी तरतूद आहे. अजित पवारांच्या निधनानंतर ३० जानेवारीपर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. यामुळे निवडणुकीच्या तारखा बदलण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा :
पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर! बारामतीचे ‘दादा’ हरपले, देशभरात शोककळा
अजित पवारांचे निधन! बारामतीत पोहचताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या अश्रू अनावर