अजित पवारांनी बीडच्या विकासासाठी घेतलेला पुढाकार हा केवळ (dream)घोषणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीत उतरल्याचे चित्र दिसले. बीडच्या रेल्वेबाबत कुणीही आग्रह धरला नव्हता, मात्र कामाची आवड आणि विकासाची दृष्टी असल्याने त्यांनी हा मुद्दा स्वतःहून हाती घेतला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी अहिल्यानगर ते बीड या लोहमार्गावर रेल्वे धावेल, असा दिलेला शब्द त्यांनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी पूर्ण केला आणि ४५ वर्षांचे बीडकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.

रेल्वेमुळे जिल्ह्याच्या विकासाच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या. (dream)याचबरोबर विमानतळ, कौशल्यवर्धन केंद्र, विज्ञान पार्क, तारांगण, मल्टीस्पेशालिटी रुग्णालय असे अनेक प्रकल्प त्यांनी मार्गी लावले. आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्यासाठी अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार, जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा आणि कॅथलॅबसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
पालकमंत्री म्हणून त्यांनी वार्षिक योजनेचा निधी वाढवून प्रशासनावर थेट पकड ठेवली. (dream)त्यामुळे शिस्त, गती आणि जबाबदारीचे वातावरण निर्माण झाले. वाढत्या गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाया करत सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यांच्या अकाली निधनानंतर विकासाबाबत पोरकेपणाची भावना असली, तरी बीडमध्ये बदलाची प्रक्रिया सुरू झाल्याचे वास्तव नाकारता येणार नाही.
हेही वाचा :
कोल्हापूर राजकारणात भूकंप? इंगवले गटाचा शिंदे गटात प्रवेश, भाजपला हादरा
महिलांचा हार्ट अटॅक वेगळा का? छातीत वेदना न होता दिसणारी 7 लक्षणं तज्ज्ञांनी स्पष्ट केली