राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार अनंतात विलीन झाले आहेत.(allegations) त्यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला होता. बारामतीच्या दौऱ्यावर असताना विमान लँडिंगच्या वेळी हा अपघात घडला. अपघातात त्यांच्यासोबत इतरही चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये त्यांचा सुरक्षा रक्षक, दोन पायलट, एका फ्लाईट अटेंडन्टचा समावेश आहे. अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी राज्यभरातून हजारो लोक त्यांना निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये जमा झाले होते. यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यातील आमदार, खासदार, मंत्री तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचे सगळे चाहते (allegations) आपापल्या गावी परतत आहेत. असे असतानाच आता ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून कळबळ उडवून दिली आहे. त्यांनी भाजपावर सडकून टीका केली असून अजित पवार यांच्यावरील आरोपांविषयी मोठी मागणी केली आहे.संजय राऊत यांनी आपल्या एक्स खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भाजपाला घेरलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपाने 29 जानेवारी रोज बहुसंख्य मराठी वर्तमानपत्रांमध्य जाहिराती देऊन अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केल आहे. याच जाहिरातींचा उल्लेख करून त्यांनी भाजपावर टीका केली आहे. ‘भाजपाने कमाल केली.
दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भाजपाने पानभर जाहिराती दिल्या.(allegations) परंतू त्याने काय होणार?’ असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच अजितदादांवर भाजपा म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले 70 हजार कोटी रुपयांचे आरोप मागे घेणे हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले. त्यांनी अजितदादांवर करण्यात आलेल्या 70 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे.दरम्यान, आता संजय राऊत यांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. भाजपाचे नेतेमंडळी काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर! बारामतीचे ‘दादा’ हरपले, देशभरात शोककळा
अजित पवारांचे निधन! बारामतीत पोहचताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या अश्रू अनावर