काळम्मावाडी ३३ विद्युत वाहिनीच्या सबस्टेशनमध्ये आयसोलेटर (water)बसवण्यात येणार आहे. सोमवार दिनांक ९ व मंगळवार दिनांक १० असे दोन दिवस हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत होणार आहे. या कामामुळे काळम्मावाडी योजनेतून होणारा उपसा बंद राहणार असून, महापालिका प्रशासनाने या कालावधीत नागदेववाडी, बालिंगा आणि शिंगणापूर येथील पंपिग स्टेशनवरून पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहराला सोमवारी, मंगळवारी अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. राज्य वीज महावितरण कंपनीचे काळम्मावाडी ३३ केव्ही विद्युत वाहिनीच्या सबस्टेशनच्या ठिकाणी आयसोलेटर बसवण्याचे काम महावितरणकडून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे काळम्मावाडी योजनेमधून शहराला पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.

कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा (water)आणि नागदेववाडी पंपींग स्टेशनमधून पाणी पुरवठा होणार आहे. शहरातील ए, बी, सी, डी आणि ई वॉर्ड त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना सोमवार व मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. बुधवारी दिनांक ११ रोजी पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी साठा जपून वापरुन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ए, बी, वॉर्ड त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भाग व शहरांतर्गत लक्षतीर्थ वसाहत, (water)संपूर्ण फूलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, राजे संभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंबे रोड, शिवाजी पेठ चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उमा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही भाग, संपूर्ण सी डी वॉर्ड अंतर्गत दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वरपेद, शुक्रवार पेद ब्रम्हपुरी, बुधवार पेठ तालीम परिसर, सिध्दार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदूचौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदिर परिसर गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब परिसर या भागाचा समावेश आहे.
तसेच या परिसरात संलग्नित गं नामीण भाग व उपनगरे तसेच ई वॉर्ड(water) अंतर्गत संपूर्ण कसबा बावडा, रमणमळा, ताराबाई पार्क, कदमवाडी, भोसलेवाडी, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, बापट कॅम्प राजीव गांधी बसाहत, लोणार वसाहत, लिशा हॉटेल परिसर, महाडीक वसाहत टेंबलाईवाडी, माळी कॉलनी, साईक्स एक्टेंशन, राजारामपूरी १ ली ते १३ वी गल्ली परिसर, मातंग वसाहत परिसर यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर राजारामपुरी एक्स्टेशन, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, शास्त्रीनगर, प्रतिभानगर, दौलतनगर शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन, ग्रीन पार्क, शाहूपुरी १ ली ते ४ थी गल्ली, व्यापारपेठ आदी परिसराचा समावेश आहे.
हेही वाचा :
T20 World Cup 2026 : दुखापतीला आणखी 1 विकेट, मॅचविनर खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेतून आऊट
Jeffrey Epstein Files : जेफ्री एपस्टिनच्या रेड रुममध्ये काय घडायचं ? जगातील सर्वात सुंदर तरुणी…