इचलकरंजी : काल दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी कोल्हापूर येथे मुंबई उच्च (advocate) न्यायालयाच्या सर्किट बेंच उद्घाटन प्रसंगी आपल्या इचलकरंजीच्या एडवोकेट प्रीती प्रकाश पटवा यांचा सत्कार माननीय सरन्यायाधीश श्री भूषण गवई साहेब व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सदरचा सत्कार हा आपल्या इचलकरंजीवासियासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी विशेष सत्कार होता. मा. सरन्यायाधीश स्टेजवरून अचानक उतरून खाली येऊ लागले त्यावेळी सर्वजण उभे राहिले सर्वजण (advocate) अचंबित होऊन पाहत होते त्याचवेळी स्टेजवरून पुकारा करण्यात आला की अशा एका व्यक्तीचा सत्कार होत आहे की जिला वयाच्या २१व्या वर्षी अचानक अपंगत्व आलं.अपंगत्व आल्यानंतर ती एल एल बी नेट सेट उत्तीर्ण झाली.

अपंगत्वावर ती मात करून तिने एलएलबी च्या नोट्स तयार केल्या आज तिचे अनेक विद्यार्थी न्यायाधीश, वकील, सीए,सीएस म्हणून उच्च पदावर सेवा देत आहेत. त्यानंतर सर्वांना या विशेष सत्कारमुर्तीची ओळख झाली. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून आपल्या इचलकरंजी च्या एडवोकेट प्रीती प्रकाश पटवा आहेत. (advocate) प्रीती पटवा या सर्वांच्या प्रेरणास्थान आहेत. कारण वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत त्या सर्वसामान्यांसारख्या अगदी धडधाकट होत्या.
त्यांच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांना अनेक वक्तृत्व स्पर्धेमध्ये निबंध स्पर्धेमध्ये व शालेय जीवनामध्ये अनेक पुरस्कार पारितोषिके मिळाली होती. ज्यावेळी त्यांनी आपली बीए ची पदवी प्राप्त केली त्यानंतर त्यांनी सांगली येथे लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतले. व तिथून त्यांच्या संघर्षाची सुरुवात झाली. त्यांनी लॉ ला ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांना कळून चुकलं की त्यांना मस्क्युलार डिस्ट्रॉफी या आजाराने घेरले आहे. सुरुवातीला त्या हताश झाल्या परंतु नंतर कुटुंबाच्या साथीने त्यांनी अनेक अडचणीवर मात करून व्हीलचेअर वरून एलएलबी व एलएलएम चांगल्या गुणवत्तेमध्ये प्राप्त केले.

त्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठात चार वर्षे प्राध्यापक म्हणून सर्विस केली. पुन्हा इचलकरंजी येथे त्यांनी लॉ क्लासेस घेण्यास सुरुवात केली आज प्रीती पटवा मॅडम यांच्या नोट्स महाराष्ट्र बाल कौन्सिल अँड गोवा यांनी प्रकाशित केल्या आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना लॉ चे चांगले शिक्षण मिळावे या अनुषंगाने सदरच्या नोट्स या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत.
प्रीती पटवा मॅडम यांचा शरीराचा कोणताही अवयव काम करत नाही त्यांना आपल्या हाताने जेवता देखील येत नाही तसेच स्वतःचे कोणतेही काम करता येत नाही अशा अडचणींवरती मात करून त्यांनी लॉच्या पाच नोट्स परिपूर्ण करून त्या प्रकाशित केल्या आहेत. त्यांनी जिद्दीने अपंगत्वावरती केलेली मात ही सर्व जनतेला प्रेरणा देणारी बाब आहे. आज-काल छोट्याशा कारणावरून निराश होणारे लोक एकीकडे आणि आपल्या शरीराच्या कोणताही अवयवाची हालचाल न होता न डगमगता अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या प्रीती पटवा मॅडम व स्वतःच्या नोट्स प्रकाशित करणाऱ्या प्रीती पटवा मॅडम या सर्वांना प्रेरणास्थान ठरणार आहेत.
सदर प्रीती पटवा मॅडम या आपल्या इचलकरंजी असून त्यांचे बंधू एडवोकेट आनंद पटवा हे त्यांच्यासोबत सदैव असतात. यापुढेही पुढील नोट्स प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे व आपण समाज उपयोगी कार्य करावे ही देखील त्यांची इच्छा आहे यातूनच त्यांची सदैव धडपड सुरू असते खरोखर प्रीती पटवा मॅडमचा कालचा सत्कार हा सोशल मीडियावरती देखील प्रचंड व्हायरल झाला व अनेकांना त्यातून प्रेरणा मिळाली ही बाब इचलकरंजीसाठी खूप भूषणावर आहे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
हेही वाचा :
अनैतिक संबंधाच्या संशयातून संताप; नवऱ्याने जावयाच्या मुलाचा गुप्तांग तोडला
Oppo F31 सीरीज भारतात लाँच होणार, वाचा फीचर्स आणि किंमत
पतीची हत्या करून ड्रममध्ये ठेवला मृतदेह, पत्नीने प्रेयसीसोबत केली पलायन