भारतात नेहमीच बजेट फ्रेंडली कारला ग्राहकांचा उदंड (cars)प्रतिसाद मिळत असतो. अशाच एका उत्तम कारबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, जी विक्रीत नंबर 1 कार ठरली आहे.

भारतात लाखो वाहनांची विक्री होत असते. यातही गेल्या(cars) काही महिन्यांपासून कार्सच्या विक्रीत चढउतार पाहायला मिळत आहे. भारतीय ऑटो बाजारात अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या अनेक वर्षांपासून विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करत आहे.

देशात Maruti Suzuki ने विविध सेगमेंटमध्ये ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार चांगल्या कार्स ऑफर केल्या आहेत. त्यामुळेच कंपनीच्या कार्सला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. कंपनीच्या काही कार तर विक्रीच्या बाबतीत सुद्धा इतर वाहनांच्या तुलनेत पुढे असतात.

भारतीय ग्राहकांमध्ये हॅचबॅक सेगमेंटला मोठी मागणी आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच जुलै 2025 मध्ये या सेगमेंटच्या विक्रीबद्दल बोलायचे झाले तर, मारुती सुझुकी वॅगनआरने त्यात अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या महिन्यात मारुती सुझुकी WagonR ने 14 हजार 710 नवीन ग्राहक मिळवले आहेत. असे जरी असले तरी मारुती वॅगनआरच्या विक्रीत वार्षिक आधारावर 9 टक्क्यांनी घट झाली आहे.

मारुती वॅगन आरची एक्स-शोरूम किंमत 5.79 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंट 8.50 लाख रुपयांपर्यंत जाते. त्याचा सीएनजी व्हेरिएंट 7.15 लाख रुपयांपासून सुरू होते, जे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी बजेट फ्रेंडली पर्याय आहे. शहर आणि व्हेरिएंटनुसार या कारच्या ऑन-रोड किमती बदलू शकतात, परंतु त्याची सुरुवातीची किंमत 2025 मधील सर्वात स्वस्त आणि सुरक्षित हॅचबॅक बनवते.

Maruti Wagon R फीचर्स आणि व्हेरिएंट्स
Wagon R मध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले सपोर्टसह 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम पाहायला मिळते. यासोबतच, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स, पॉवर विंडो, कीलेस एंट्री, ऑटो एसी आणि उंची ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

मारुती वॅगन आर मध्ये तीन वेगवेगळ्या पॉवरट्रेन पर्याय देण्यात आले आहेत, जे सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या गरजांनुसार या कारला एक चांगला पर्याय बनवतात. पहिला 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जो 65.68 बीएचपी पॉवर आणि 89 एनएम टॉर्क निर्माण करतो. दुसरा पर्याय 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जो 88.5 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क निर्माण करतो.

तिसरा पर्याय 1.0-लिटर सीएनजी इंजिन आहे, जो 88 पीएस पॉवर आणि 121.5 एनएम टॉर्क निर्माण करतो. दोन्ही पेट्रोल इंजिन पर्यायांना 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन पर्याय मिळतात, तर सीएनजी व्हेरिएंटमध्ये फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स येतो. हे सर्व इंजिन पर्याय चांगला परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता प्रदान करतात.

हेही वाचा :

अनैतिक संबंधाच्या संशयातून संताप; नवऱ्याने जावयाच्या मुलाचा गुप्तांग तोडला
Oppo F31 सीरीज भारतात लाँच होणार, वाचा फीचर्स आणि किंमत
पतीची हत्या करून ड्रममध्ये ठेवला मृतदेह, पत्नीने प्रेयसीसोबत केली पलायन

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *