स्वस्त कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी Tata Motors कडून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कंपनीने आपल्या एंट्री-लेव्हल कार्सवर आकर्षक सवलती जाहीर केल्या असून, ग्राहकांसमोर 2025 आणि 2026 मॉडेल निवडण्याचा पर्याय उभा राहिला आहे. जरी 2025 मॉडेलवर अधिक सवलत मिळत असली तरी 2026 मॉडेल खरेदी केल्यास नवीन उत्पादन वर्षामुळे मानसिक समाधान आणि दीर्घकालीन फायदा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

सध्या Tata Tiago आणि Tata Tigor या दोन किफायतशीर गाड्यांवर विशेष ऑफर्स (Tata Motors) उपलब्ध आहेत. टियागोच्या 2026 मॉडेलवर 10 हजार रुपयांची रोख सूट आणि 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळून एकूण 20 हजार रुपयांचा फायदा दिला जात आहे. याशिवाय, स्क्रॅपेज बोनस म्हणून आणखी 15 हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. टिगोर सेडानवरही ग्राहकांना 15 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत असून एकूण 25 हजार रुपयांपर्यंत बचत करता येते. त्याचबरोबर स्क्रॅपेज पॉलिसीअंतर्गत 15 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त लाभ दिला जात आहे.
मात्र, 2025 मॅन्युफॅक्चरिंग मॉडेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ऑफर्स आणखी आकर्षक आहेत. या मॉडेल्सवर एकूण 35 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो, त्यामुळे बजेट लक्षात घेणाऱ्यांसाठी हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो.
किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, टियागो (Tata Motors) ही हॅचबॅक 4.57 लाख रुपयांपासून सुरू होऊन 7.82 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. पेट्रोल आणि CNG या दोन्ही पर्यायांमध्ये येणाऱ्या या कारमध्ये 1199 सीसी इंजिन असून ते सुमारे 85 बीएचपी पॉवर निर्माण करते. तसेच या गाडीचा मायलेज 19 किमी प्रति लिटरपर्यंत आहे. दुसरीकडे, टिगोर ही कॉम्पॅक्ट सेडान 5.49 लाख रुपयांपासून सुरू होऊन 8.74 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. यातही 1199 सीसी इंजिन देण्यात आले असून पेट्रोल व्हेरिएंटमध्ये सुमारे 19.6 किमी प्रति लिटर मायलेज मिळते.
सुरक्षिततेच्या बाबतीतही या दोन्ही गाड्या मजबूत मानल्या जातात. आधुनिक (Tata Motors) फीचर्स आणि 5 स्टार सेफ्टी रेटिंगमुळे या गाड्या बजेट सेगमेंटमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सवलतींचा मोह आणि नवीन मॉडेलचे फायदे यांचा विचार करूनच अंतिम निर्णय घ्यावा, असे वाहन तज्ज्ञ सांगतात.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज