रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. (government job) रेल्वेने आपली नवीन भरती जाहीर केली आहे. असिस्टंट लोको पायलट पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. रेल्वेतील या नोकरीसाठी शॉर्ट नोटिफिकेशन जारी केले आहे. एकूण १११२७ जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे चांगली सरकारी नोकरी करण्याची संधी आहे.

रेल्वेतील असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्जप्रक्रिया १५ मेपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२६ आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी rrbapply.gov.in वर जाऊन अर्ज करावे.
रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदासाठी (government job) अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. आयटीआय पास झालेले असावे. याचसोबत इंजिनियरिंगचा डिप्लोमा केलेला असावा. ज्यांनी इंजिनियरिंग केले आहे त्यांनीच अर्ज करावेत. या नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
असिस्टंट लोको पायलट पदासाठी उमेदवारांची निवड (government job) सीबीटी टेस्ट १, सीबीटी टेस्ट २ आणि कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाणार आहे. यानंतर मेडिकल टेस्ट होणार आहे.या नोकरीसाठी निवड झाल्यावर सुरुवातीला १९,९०० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर भत्तेदेखील दिले जाणार आहेत.
रेल्वेतील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. काही दिवसात तुमच्यासाठी अर्जप्रक्रिया सुरु होईल. त्यानंतर इच्छुकांनी अर्ज करावेत.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज