पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील तणावाने आता भीषण रूप धारण केलं (conflict) असून गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. काल रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने ‘ऑपरेशन गजब लिल हक’ अंतर्गत काबूलवर मोठा एअर स्ट्राइक केला. या हल्ल्यात एका रुग्णालयालाही लक्ष्य करण्यात आल्याचा दावा अफगाण अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांच्या माहितीनुसार या भीषण हल्ल्यात सुमारे ४०० निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला असून २५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, पाकिस्तानकडून या (conflict) कारवाईचे समर्थन करण्यात आले आहे. हा हल्ला दहशतवादी तळांवर लक्ष्य साधून करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून यासंबंधीचे व्हिडिओ फुटेजही प्रसिद्ध करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या भूमिकेनुसार, अफगाणिस्तानातून पाकिस्तानविरोधात हल्ल्यांची योजना आखली जात असल्याने ही कारवाई आत्मसंरक्षणासाठी आवश्यक होती.
या घटनेनंतर अफगाणिस्तानात तीव्र संताप व्यक्त होत आहे. जबीहुल्लाह मुजाहिद यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, आता चर्चा आणि कूटनीतीची वेळ संपली असून या हल्ल्याचा बदला घेतला जाईल. त्यांनी पाकिस्तानला थेट जबाबदार धरत कठोर प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिले आहेत.

युद्धाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि सैनिकी (conflict) कारवाया सुरू आहेत. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी यापूर्वीच इशारा दिला होता की, काबूलवर हल्ला झाल्यास पुढील लक्ष्य इस्लामाबाद असेल. याच पार्श्वभूमीवर तालिबानने अलीकडेच इस्लामाबाद, क्वेटा आणि रावळपिंडी येथील लष्करी ठिकाणांवर हल्ले केल्याचा दावा केला होता. विशेषतः नूर खान एअरबेसवर हल्ला केल्याचा दावा समोर आला होता.

सीमेवरील परिस्थिती (conflict) अधिकच तणावपूर्ण बनली आहे. डूरंड लाइनजवळ दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने उभे असून सतत चकमकी सुरू आहेत. वाढत्या तणावामुळे हा संघर्ष मोठ्या युद्धात परिवर्तित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काबूलवरील हल्ल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर अफगाण नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तालिबानकडून ‘हा हल्ला लक्षात राहील अशा पद्धतीने उत्तर दिलं जाईल’ असा इशारा देण्यात आला असून त्यामुळे येत्या काळात परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *