हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण असलेला गुढीपाडवा नववर्षाची सुरुवात (Hinduism) मानला जातो. नवीन वर्षाच्या आगमनाचा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च रोजी साजरा केला जाणार असून या दिवशी गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त सकाळी 6 वाजून 44 मिनिटांपासून ते 8 वाजून 14 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेत गुढी उभारल्यास विशेष शुभ मानले जाते.

गुढीपाडव्याच्या दिवशी केवळ नववर्षाचे स्वागतच नाही, तर अनेक जण नवीन संकल्प करून आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाच्या मनात येणारं वर्ष आनंददायी, समृद्ध आणि आरोग्यपूर्ण जावं अशी इच्छा असते. विशेषतः आर्थिक स्थैर्य आणि भरभराटीची अपेक्षा प्रत्येक घरात असते.
वास्तुशास्त्रानुसार, गुढीपाडव्याच्या (Hinduism) दिवशी काही सोपे उपाय केल्यास घरात सुख-समृद्धी वाढण्यास मदत होते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करणे महत्त्वाचे मानले जाते. पूजनानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र घेऊन त्यामध्ये तांदूळ, हळकुंड, दालचिनीचा छोटा तुकडा आणि काही नाणी ठेवावीत. हे सर्व वस्त्रात बांधून स्त्रीसूक्ताचे पठण करावे आणि नंतर ते गाठोडे घरातील तिजोरीत ठेवावे.
अशी श्रद्धा आहे की या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि (Hinduism) आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतात. कर्जबाजारीपणातून मुक्ती मिळण्यासही मदत होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरावर कायम राहतो.यासोबतच, धनप्राप्तीसाठी घराच्या उत्तर दिशेला कुबेर देवतेचा फोटो लावणेही शुभ मानले जाते. कुबेराची नियमित पूजा केल्यास धनवृद्धी होते, असे मानले जाते. गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी केलेले हे छोटे उपाय वर्षभर सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देतात, अशी श्रद्धा आहे.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज