केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं (BJP) असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यातील काथिरूर परिसरात भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फेकण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, काथिरूरमधील कोकांची भागात राहणाऱ्या मजीशा पथायाकुन्नु या भाजप कार्यकर्त्याच्या घराजवळ रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती आली. (BJP) त्याने घरासमोर येत शिवीगाळ केली आणि त्यानंतर थेट घरावर बॉम्ब फेकला. बॉम्बचा जोरदार स्फोट झाल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, केरळमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून १४० जागांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत आणि वातावरण चिघळलेलं दिसत आहे. (BJP) अशा परिस्थितीत घडलेल्या या हल्ल्यामुळे राजकीय तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या घटनेचा भाजप कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध करण्यात येत असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून संशयितांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात लवकरच ठोस कारवाई होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा :

लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

‘रामायण’ चित्रपटासाठी रणबीर कपूर, सनी देओल या अभिनेत्यांनी जी फि घेतलीय तो आकडा ऐकून तुम्ही अवाक व्हाल

चांगले दिवस आले रे…सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, दागिने करण्याची हीच योग्य वेळ!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *