नोव्हेंबरमध्ये लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर राजधानी पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती, (capital) अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. टॉय कारच्या माध्यमातून मोठा घातपात घडवण्याचा कट रचण्यात आल्याचा उलगडा झाला असून सुरक्षा यंत्रणांनी वेळीच कारवाई करत हा कट उधळून लावला आहे.

या प्रकरणी मुंबईतील कुर्ला भागातून 18 वर्षीय हमास सिद्दीकीला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली स्पेशल सेल यांनी संयुक्त कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले. (capital) या कारवाईमुळे राजधानी दिल्लीत संभाव्य मोठा धोका टळल्याचं सांगितलं जात आहे.तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हमास सिद्दीकी काही संशयित व्यक्तींच्या संपर्कात होता आणि दिल्लीत घातपात करण्याच्या कटात सहभागी असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे टॉय कारचा वापर करून स्फोट घडवण्याचा प्लॅन आखण्यात आला होता, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांसाठी हे प्रकरण अधिक गंभीर मानलं जात आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या हमास सिद्दीकीच्या वडिलांनी या सर्व आरोपांना नकार दिला आहे. जलालुद्दीन सिद्दीकी यांनी सांगितलं की, पहाटे ४.३० ते ५ च्या सुमारास १८ ते २० अधिकारी त्यांच्या घरी आले आणि मुलाला ताब्यात घेऊन गेले. त्यांचा मुलगा नुकताच १८ वर्षांचा झाला असून तो एक विद्यार्थी आहे, गुन्हेगार नाही, असा दावा त्यांनी केला.(capital) गेल्या काही महिन्यांत त्याचे फोन कॉल्स वाढले होते, मात्र त्याशिवाय कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.तपास यंत्रणांच्या मते, ऑनलाइन गेमिंगदरम्यान काही अज्ञात व्यक्तींशी संपर्कातून हा कट रचला गेला असण्याची शक्यता आहे. मात्र कुटुंबीयांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, आपल्या मुलावर लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे.सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणा अधिक तपशील गोळा करत आहेत. या कारवाईमुळे राजधानीत होऊ शकणारा मोठा दहशतवादी हल्ला टळल्याचं मानलं जात आहे.
हेही वाचा :
लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार
चांगले दिवस आले रे…सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, दागिने करण्याची हीच योग्य वेळ!