अभय सिंह पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत, पण यावेळी त्यांच्या आध्यात्मिक (spiritual journey) प्रवासामुळे नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या अध्यायामुळे. महाकुंभ मेळा 2025 दरम्यान साधू वेशात देशभरात प्रसिद्धी मिळवलेले अभय सिंह यांनी गुपचूप विवाह केल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ६ एप्रिल रोजी हरियाणातील झज्जर येथे अभय सिंह आपल्या पत्नीसोबत दिसले. यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांनी १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर हिमाचल प्रदेशातील अघंजर महादेव मंदिर येथे विवाह केला होता. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी त्यांनी कोर्ट मॅरेज करून आपल्या नात्याला अधिकृत स्वरूप दिले.

अभय सिंह यांनी आपल्या (spiritual journey) नव्या आयुष्याबद्दल बोलताना सांगितले की, ते आणि त्यांची पत्नी प्रतिका सध्या अत्यंत साधेपणाने जीवन जगत असून या नव्या टप्प्यात ते समाधानी आहेत. प्रतिका मूळच्या कर्नाटकातील असून त्या देखील अभियंता आहेत. सध्या हे दांपत्य हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे वास्तव्यास आहे. झज्जर भेटीदरम्यान अभय सिंह यांनी आपल्या कुटुंबीयांची भेट घेतली. भगव्या वस्त्रांमध्ये ते आपल्या वडिलांच्या चेंबरमध्ये पोहोचले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, आध्यात्मिकतेकडे वळण्यापूर्वी ते येथे बसून कायदेविषयक कागदपत्रे आणि केस स्टडीज पाहत असत. “जीवनाचा खरा अर्थ शोधताना मी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगातून अध्यात्माकडे वळलो,” असे त्यांनी नमूद केले.

प्रतिका यांनीही अभय सिंह यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करत त्यांना अत्यंत साधे, प्रामाणिक आणि खरे माणूस असल्याचे सांगितले. दोघांची ओळख सुमारे वर्षभरापूर्वी झाली होती आणि आता ते मिळून सनातन धर्म व आध्यात्मिकतेचा प्रसार करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात ‘सनातन युनिव्हर्सिटी’ स्थापन करण्याची त्यांची योजना असून, त्याद्वारे गुरू, साधक आणि आध्यात्मिक अभ्यासकांना एकत्र आणण्याचा त्यांचा मानस आहे.

अभय सिंह यांचा (spiritual journey) प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. IIT Bombay येथून एरोस्पेस इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी परदेशात उच्च वेतनाची नोकरी केली. मात्र, भौतिक यशाला मागे टाकत त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. महाकुंभ मध्ये त्यांच्या साधू रूपातील उपस्थितीने त्यांना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील या नव्या वळणामुळे ‘आयआयटीयन बाबा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभय सिंह यांच्याबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

हेही वाचा :

लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

‘रामायण’ चित्रपटासाठी रणबीर कपूर, सनी देओल या अभिनेत्यांनी जी फि घेतलीय तो आकडा ऐकून तुम्ही अवाक व्हाल

चांगले दिवस आले रे…सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, दागिने करण्याची हीच योग्य वेळ!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *