मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण (world politics) यांच्यातील संघर्षाने जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धामध्ये सुरुवातीला अमेरिका आणि इस्त्रायल यांना जलद विजय मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच निर्माण झाली असून इराणने जोरदार प्रतिकार करत युद्ध अधिकच लांबवलं आहे.

युद्धाच्या सुरुवातीपूर्वीच अमेरिकेने (world politics) मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणावर सैन्यबळ आणि युद्धनौका तैनात केल्या होत्या. त्यानंतर इस्त्रायलने इराणवर हल्ला चढवला आणि संघर्षाला तोंड फुटलं. पुढे अमेरिका देखील या लढाईत उतरली. सततच्या हवाई हल्ल्यांमुळे इराणचे मोठे नुकसान झाले असले तरी त्यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. उलट इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने जोरदार प्रत्युत्तर देत अमेरिका आणि इस्त्रायलला अडचणीत टाकलं आहे. या संघर्षामुळे अमेरिकेवर आर्थिक आणि लष्करी ताण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र दिसत आहे. युद्धावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने अमेरिकेतही चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार इराणकडे युद्धविरामाचा प्रस्ताव पाठवला असल्याचं समोर येत आहे. मात्र इराणकडून हे प्रस्ताव सातत्याने फेटाळले जात असल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली आहे.

दरम्यान, (world politics) या घडामोडींमध्ये ट्रम्प यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वी त्यांनी कॅनडा बाबत आक्रमक भूमिका घेत, त्याला अमेरिकेचं ५१वं राज्य बनवण्याचा दावा केला होता. मात्र सध्याच्या युद्धपरिस्थितीचा परिणाम म्हणून त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करत कॅनडावर कोणताही हल्ला केला जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे. कॅनडाचा दीर्घ इतिहास आणि स्वतंत्र ओळख लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. या संपूर्ण परिस्थितीमुळे जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. एकीकडे मध्यपूर्वेतील युद्ध अजूनही पेटलेलं असताना दुसरीकडे संभाव्य नव्या संघर्षाचा धोका टळल्याने काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला जात आहे. मात्र या युद्धाचा शेवट कधी आणि कसा होणार, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे.

हेही वाचा :

लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

‘रामायण’ चित्रपटासाठी रणबीर कपूर, सनी देओल या अभिनेत्यांनी जी फि घेतलीय तो आकडा ऐकून तुम्ही अवाक व्हाल

चांगले दिवस आले रे…सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, दागिने करण्याची हीच योग्य वेळ!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *