Employees’ Provident Fund Organisation (EPFO) कडून राबवण्यात येणारी EPFO 3.0 ही नवीन डिजिटल प्रणाली आता PF खातेदारांसाठी मोठा बदल घडवून आणण्याच्या तयारीत आहे. PF चे पैसे (digital system) काढण्यासाठी लागणारी किचकट प्रक्रिया लवकरच भूतकाळात जमा होऊ शकते. या नव्या प्रणालीमुळे खातेदारांना थेट ATM आणि UPIच्या माध्यमातून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

EPFO ने सेवानिवृत्ती व्यवस्थापन अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्यासाठी EPFO 3.0 ची सुरुवात केली असून 2026 च्या मध्यापर्यंत ही प्रणाली पूर्ण क्षमतेने लागू होण्याची अपेक्षा आहे. या बदलामुळे सदस्यांना कार्यालयीन प्रक्रियेचा त्रास न होता त्यांच्या PF निधीपर्यंत जलद आणि सोपी पोहोच मिळणार आहे.

या नव्या व्यवस्थेत सदस्यांना UPI वरच (digital system) त्यांच्या PF खात्याची शिल्लक पाहता येईल. तसेच ATM कार्ड जारी करण्याचाही विचार सुरू असून हे कार्ड थेट PF खात्याशी जोडलेले असेल. त्यामुळे बँकेत जाण्याची गरज न पडता ATM मधूनच पैसे काढणे शक्य होईल. याशिवाय PF रक्कम थेट सदस्यांच्या पसंतीच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रियाही अधिक जलद आणि सोपी केली जाणार आहे.

मात्र या (digital system) सुविधांसाठी काही अटी लागू राहणार आहेत. सदस्याचा UAN सक्रिय असणे आवश्यक आहे तसेच त्याचा मोबाईल क्रमांक कार्यरत असणे गरजेचे आहे. याशिवाय UAN हे आधार, पॅन आणि बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक राहील. नव्या प्रणालीत PF मधील संपूर्ण रक्कम काढण्यावर मर्यादा ठेवण्याची शक्यता असून, एकूण शिल्लक रकमेपैकी सुमारे 50 टक्के रक्कमच ATM किंवा UPI द्वारे काढता येऊ शकते, अशी चर्चा आहे.

EPFO ने या प्रक्रियेला अधिक वेग देण्यासाठी देशातील 32 सरकारी आणि खासगी (digital system) बँकांशी करारही केले आहेत. यामुळे PF दावे जलद प्रक्रियेत पूर्ण होतील आणि निधी थेट खात्यात जमा होईल. एकंदरीत, EPFO 3.0 मुळे PF काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि डिजिटल होणार असून, खातेदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

‘रामायण’ चित्रपटासाठी रणबीर कपूर, सनी देओल या अभिनेत्यांनी जी फि घेतलीय तो आकडा ऐकून तुम्ही अवाक व्हाल

चांगले दिवस आले रे…सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, दागिने करण्याची हीच योग्य वेळ!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *