प्रेमानंद महाराजांच्या सत्संगात अनेक लोकांना काही ना काही गवसते. त्यांना जीवन कसं जगावं याचे मार्गदर्शन मिळते. महाराज म्हणतात या वाईट सवयींमुळे (Habit)अनेकांचे नुकसान होते.आमिष, हाव यामुळे अनेकांची घरं उद्धवस्त होतात. योग्य मार्गाने आलेला पैसा दीर्घकाळ तुमच्या घरात टिकून राहिल.

भ्रष्टाचाराच्या मार्गाने आलेला पैसा हायड्रोजन प्रमाणे आहे. तो प्रकाश देईल आणि थोड्यावेळाने अंधार होईल.आमिष, हाव यामुळे अनेकांची घरं उद्धवस्त होतात.
कधी कधी अपमान पण वाट्याला यायला हवा. तो सहन करायला शिकता आले पाहिजे. त्यामुळे अपमान झाला तर शांत व्हा. त्याची सल मनात ठेवू नका. कुठं चुकलात ते शोधा आणि प्रगत व्हा.

सतत कुणाचं तरी द्वेष केल्यास तुम्ही क्रोधीत व्हाल. एखाद्याचे नुकसान व्हावे अशी इच्छा करणारा कधी सुखी राहू शकत नाही. जो तुमचे वाईट चिंततो त्याच्याकडे लक्ष देऊ नका.
गरजूला मदत जरूर करा. ज्याला आश्रयाची गरज आहे, त्याला तो निःस्वार्थ भावनेने द्या. पशु,पक्षी यांना मदत करता आली तर नक्की करा खोटे बोलणं, फसवणूक यामुळे कुटुंबातील सदस्यांचा तुम्ही विश्वास गमावतात. त्यामुळे कुटुंबात कलह, भांडणं होतात ही सवय (Habit)घातक असल्याचे महाराज म्हणतात.
हेही वाचा :
2400 कोटींचं कर्ज… अदानींनी परदेशातून का आणला एवढा पैसा
गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर..
‘तर माझी स्वर्गातील जागा फिक्स!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले ते ओपन सीक्रेट