धक्कादायक ! पत्नीने नांदण्यास नकार दिल्याने पतीने थेट चाकूच भोसकला; पोटावर, कमरेत सपासप वार

पंढरपूर : पत्नीने पतीस नांदायला येण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात पतीने धारदार चाकूने(knife) भोसकून पत्नीला संपवलं. संतापलेल्या पतीने पत्नीच्या पाठीत, पोटात व कमरेवर चाकूने वार करत भोसकून गंभीर जखमी केले होते. मात्र, यामध्ये जखमी झालेल्या महिलेला मृत्यू झाला. या अशा घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरती अमोल पाटील (वय ३२, रा. मेटकरी गल्ली, मंगळवेढा) असे मृत महिलेचे नाव आहे. या हाणामारीत आरातीचा सासरा अंबादास पाटील (ढेकळेवाडी), भाऊ प्रसाद रामचंद्र चौगुले व आई सोनाली रामचंद्र चौगुले (रा.मेटकरी गल्ली) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गेल्या चार-पाच वर्षांपासून विवाहित आरतीचा पतीसोबत वाद असल्याने ती माहेरी मंगळवेढा येथील शनिवार पेठेत आपल्या आई-वडिलांकडे राहत होती.

सासरी नांदण्यास घेऊन जाण्यासाठी म्हणून पती व सासू-सासरे आल्यानंतर सासऱ्याला मेहुणा प्रसाद चौगुले याने मारहाण केली. पती अमोल याने पत्नीला ‘नांदण्यास घेऊन जाण्यासाठी आलो आहे, चल’ असे सांगताच तिने नांदण्यास येण्यासाठी नकार दिला.

वडीलास होत असलेली मारहाण व पत्नीने दिलेला नकार यामुळे पती अमोल चांगलाच संतापला. याच संतापाच्या भरात अमोलने पत्नीच्या पोटात, पाठीत व कमरेत धारदार चाकूने(knife) वार करून गंभीर जखमी केले. तिला उपचारासाठी प्राथमिक रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरतीला मृत घोषित केले.

दरम्यान, इतर जखमींवर मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सदर घटनेची माहिती समजताच तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड व पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्ढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी आरती हिची आई सोनाली रामचंद्र चौगुले यांनी फिर्याद दिली असून, पती अमोल अंबादास पाटील, सासरा अंबादास पाटील, सासू विमल अंबादास पाटील यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

महिना संपताना निफ्टीची सेंच्युरी, 400 च्या वर उघडला सेन्सेक्स, IT Stock ची घोडदौड

कोल्हापुरात प्राध्यापिकेला साडेतीन कोटींचा गंडा; 40 दिवसात 15 वेळा पैसे उकळले

खेळाडूची सटकली, फलंदाजाच्या अंगावर धावला, दोन-तीन फटके लगावले Video