राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने 18 वर्षानंतर इंडियन प्रिमियर लीग 2025 ची ट्राॅफी जिंकली आणि त्यांना त्यानंतर त्याची परतफेड फारच महागात पडली होती. आरसीबीच्या (RCB)चाहत्यांसाठी स्टेडियममध्ये मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्याचा आरसीबीच्या मॅनेजमेंटचा इरादा होता पण असे न होता या मोठ्या उत्साहात 11 जणांना जिव गमवावा लागला होता त्यांना चेंगराचेगरी प्रकरणामध्ये अनेकांना यामध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणामध्ये देखील आरसीबीच्या संघावर दंड ठोठावण्यात आला होता.

चेंगराचेगरी प्रकरण झाल्यानंतर सोशल मिडियावर देखील मागील तीन महिने राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या मॅनेजमेंटने कोणतीही पोस्ट केली नव्हती. त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील निराशा पाहायला मिळाली होती. आता या चेंगराचेगरी प्रकरणाच्या तीन महिन्यानंतर आरसीबीच्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी संदेश दिला यामध्ये नक्की त्यांनी काय म्हटले आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.

आरसीबीच्या (RCB)सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करुन लिहीले आहे की, प्रिय १२व्या सैनिक सैन्या, हे आमचे तुम्हाला हार्दिक पत्र आहे! शांतता ही अनुपस्थिती नव्हती तर ती दुःखाची गोष्ट होती. ही जागा एकेकाळी ऊर्जा, आठवणी आणि क्षणांनी भरलेली होती ज्यांचा तुम्ही सर्वात जास्त आनंद घेतला होता.. पण ४ जूनने सगळं बदलून टाकलं. त्या दिवसाने आमची मने तोडली आणि तेव्हापासूनची शांतता ही जागा टिकवून ठेवण्याचा आमचा मार्ग बनली आहे असे त्यांनी सांगितले.

पुढे या पत्रामध्ये सांगितले आहे की, त्या शांततेत, आम्ही दुःखी आहोत, ऐकत आहोत, शिकत आहोत. आणि हळूहळू, आम्ही फक्त प्रतिसादापेक्षा काहीतरी अधिक निर्माण करू लागलो आहोत. ज्यावर आम्ही खरोखर विश्वास ठेवतो.

अशा प्रकारे 𝗥𝗖𝗕 𝗖𝗔𝗥𝗘𝗦 जिवंत झाले. ते आमच्या चाहत्यांना सन्मानित करण्याच्या, बरे करण्याच्या आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या गरजेतून वाढले. आमच्या समुदायाने आणि चाहत्यांनी आकार दिलेल्या अर्थपूर्ण कृतीसाठी एक व्यासपीठ. आम्ही आज या जागेत परतलो आहोत, उत्सवाने नाही तर काळजीने. शेअर करण्यासाठी तुमच्यासोबत उभे राहण्यासाठी. एकत्र पुढे चालण्यासाठी, कर्नाटकचा अभिमान बनत राहण्यासाठी.या पत्रावर आरसीबीच्या चाहत्यांच्या काही वेळातच लाखो प्रतिक्रिया आल्या आहेत. त्याचबरोबर खेळाडूंबद्दल देखील चाहते प्रेम व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसला दिर, नको ते करू लागला…

या क्रिकेट खेळाडूंनी केले गणरायाचे स्वागत

मुलांच्या हातात बाईकची चावी देणं पडलं महागात; घडला भयंकर अपघात, Video Viral

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *