गणेशोत्सवाच्या उत्साहात सध्या सर्वत्र सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. वर्षभराच्या प्रचंड मेहनतीनंतर अनेक नोकरदारांना सुट्टी मिळाल्यानं त्यांनीही आपल्या घराची वाट धरली आहे. गावखेडी अक्षरश: बहरून निघाली आहेत. अशातच एका अनपेक्षित बातमीनं सर्वांचं लक्ष वेधलं. जिथं गणेशोत्सवासाठी निघालेल्या शिक्षकांच्या कुटुंबाशी (Family)संपर्क होत नसल्याची बातमी समोर आली आणि अनेकांनाच धक्का बसला.

गुहागरहून हिंगोलीत निघालेलं शिक्षकाचं कुटुंब बेपत्ता झाल्याचं वृत्त प्राथमिक स्वरुपात समोर आलं. गुहागर इथं शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह गणपतीसाठी मंगळवारी हिंगोलीच्या दिशेनं प्रवास सुरू केला. गणेशोत्सवासाठी मूळ गावी निघालेलं चव्हाण कुटुंब त्यांच्या कारनं प्रवास करत होतं. चिपळूण परिसरात त्यांचा शेवटचा संपर्क झाला होता.
चिपळूणनंतर मात्र त्यानंतर या कुटुंबाचे (Family)दोन्ही मोबाईल बंद असल्याचं आढळलं आणि नातेवाईकांची चिंता वाढली. पोलिसांकडून या कुटुंबाचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. इतकंच नव्हे तर या कुटुंबाची माहिती मिळाल्यास तातडीनं पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहनही नागरिकांना करण्यात आलं आणि अखेर 40 तासांनंतर हा कुटुंबाचा ठावठिकाणा कळला.

गुहागरहून हिंगोलीत निघालेलं शिक्षक कुटुंब अखेर सापडल्याचं वृत्त समोर येताच अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. साताऱ्यातील गोंदवले गावात हे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती समोर आली. दरम्यान या प्रकरणातील सविस्तर माहिती अद्यापही प्रतीक्षेत असून, पोलीस यंत्रणांकडून त्यासंदर्भात कोणती माहिती जारी केली जाते याकडे अनेकांचं लक्ष आहे.
चव्हाण कुटुंबात गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण, त्यांच्या पत्नी आणि दोन मुले यांचा समावेश आहे. ते गणेशोत्सवासाठी गुहागर (रत्नागिरी) येथून हिंगोलीला आपल्या मूळ गावी निघाले होते. मंगळवारी (25 ऑगस्ट 2025) चव्हाण कुटुंब कारने हिंगोलीच्या दिशेने निघाले. चिपळूण परिसरात त्यांचा शेवटचा संपर्क झाला, त्यानंतर त्यांचे दोन्ही मोबाईल बंद असल्याचे आढळले, ज्यामुळे ते बेपत्ता झाल्याचे समजले.
पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आणि नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले. 40 तासांनंतर चव्हाण कुटुंब साताऱ्यातील गोंदवले गावात सुखरूप असल्याचे आढळले.
हेही वाचा :
विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसला दिर, नको ते करू लागला…
या क्रिकेट खेळाडूंनी केले गणरायाचे स्वागत
मुलांच्या हातात बाईकची चावी देणं पडलं महागात; घडला भयंकर अपघात, Video Viral