देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत असताना गुजरातमधील बडोदा शहरात या पवित्र सणाला गालबोट लावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पाणीगेट परिसरात २५ ऑगस्टच्या मध्यरात्री निर्मल पार्क युथ क्लबने स्थापित केलेल्या गणेशमूर्तीवर अज्ञात व्यक्तींनी अंडीफेक (eggs)केली.

या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषदेचे वडोदरा महानगर सचिव विष्णू प्रजापती यांनी सांगितले की, ही घटना पोलिसांच्या उपस्थितीतच घडली असून, हा मोठ्या कटाचा भाग असू शकतो. त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
गणपती मंडळाचे सदस्य सत्यम यांनी सांगितले की, मूर्ती घेऊन जात असताना तिसऱ्या मजल्यावरून अंडी(eggs) फेकण्यात आली. ताबडतोब पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही अंडीफेक झाली. ही घटना मजार मार्केट, किशनवाडी कृष्णा तलाव परिसरात घडली.

शहर पोलिस ठाण्याचे पीआय राजेंद्र चौहान यांनी सांगितले की, प्रकरणाची चौकशी सुरू असून आतापर्यंत चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा :
टॉप १० टी-२० गोलंदाजांच्या यादीत भारताचे नाव नाहीच..!
गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार, अश्लील फोटो….
मी झोपलो असताना अचानक दिव्या आली अन् माझ्या छातीवर….