मनोज जरांगे (reservation)पाटील हे सकाळी मुंबत आले आहेत. त्यांच आंदोलन आता सुरु झालं आहे. त्यांनी सर्व आंदोलकांना विनंती केली आहे की, कुणाला त्रास होईस असं वागू नका. त्यांच्या या आवानासारख आम्हीही आवाहन करतो की या विषयात चर्चेतून मार्ग निघेल. त्यामुळे जरांगे यांच्या पूर्ण मागण्याबद्दल आम्ही सकारात्मक आहोत.

आता फक्त आश्वासन नाही तर कायद्याने मार्ग काढावा लागेल असं म्हणत मराठा आंदोलनाच्या जरांगे पाटील यांच्या मागणीवर काहीतरी तोडगा निघेल असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.
कायद्याने सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. त्यांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यावर न्यायालयात (reservation)निर्णय झालेला आहे. त्यामुळे हा विषय आता सरकारच्या नाही तर न्यायलयाच्या आखत्यारीत आहे. त्यामुळे त्यांना मुदतवाढ द्यायची की आणखी काही निर्यण द्यायचा हा सर्व अधिकार किंवा विषय न्यायालयाच्या कक्षेत आहे असं म्हणत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची मुदतवाढ देण्यात यावी यावर बोलतना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बचावात्मक पवित्रा घेतला.
हेही वाचा :
सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री
ISRO देणार मोफत ट्रेनिंग! शिक्षणही आणि थोडेफार पैसेही; कसे करावे अर्ज?
रस्त्यावरच अंघोळी अन् तिथेच आराम… Maratha Reservation Morcha चे Video Viral