आजकाल सगळ्याच स्त्रीया मेकअप करतात. मेकअप तुमच्या सुंदरतेत आणखी भर घालतो.(makeup)यामुळे तुम्ही अधिक आकर्षक दिसता आणि तुमचा आत्मविश्वासही वाढतो. पण अनेक मेकअप प्रोडक्ट्स केमिकलने बनलेली असतात. जे त्वचेसाठी हानिकारक असू शकतात. हे प्रोडक्ट्स दिवसभर चेहऱ्यावर राहिल्यास त्वचेला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. यामुळे मेकअपचा वापर करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

नेल पॉलिश, हेअर स्प्रे, लिप्सस्टिक, आयशॅडो, फाउंडेशन यांसारख्या मेकअप प्रोडक्ट्समध्ये फॅथलेट्स हे विषारी केमिकल वापरले जाते. जे त्वचेत मुरल्यास आरेग्य संबंधित अनेक समस्यांना निमंत्रण देऊ शकते. यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. एवढेच नाही, तर फॅथलेट्स मधील डिबीपी आणि डिईएचपी या घटकांमुळे प्रजननसंस्था तसेच शरिरीक विकासात्मकतेवर परिणाम होऊ शकतो. संवेदनशील त्वचेवर उलट प्रतिक्रिया होऊन लालसरपणा, खाज सुटणे, पुरळ येणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
मेकअप प्रोडक्ट्स विशेषत: तेल आधारीत असतात. जे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचे छिद्र बंद होतात. ज्यामुळे त्वचेला श्वास घेण्यास अडथळा येतो. त्वचेवर तेल व मृत त्वचेच्या पोशी जमा होतात.(makeup)आणि त्वचा लवकर म्हातारी होण्याची शक्यता वाढते. शिवाय चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आणि मुरुमांचे प्रमाण वाढते. वारंवार मेकअप केल्यास किंवा तो त्वचेवर दिर्घकाळ रहिल्यास त्वचेच्या नैसर्गिक नूतणीकरणावर परिणाम होऊन सुरकुत्या येतात व त्वचेचा रंग निस्तेज होतो.

त्वचेच्या आरोग्यासाठी मेकअप वापरताना पुढील काळजी घ्या :
१. नॉन-कॉमेडोजेनिक मेकअप प्रोडक्ट्स वापरा. यामध्ये त्वचेवरील छिद्र बंद होण्याची शक्यता कमी असते.
२. झोपण्यापूर्वी एखाद्या माइल्ड क्लीन्झरने संपूर्ण मेकअप काढा. (makeup)त्यानंतर चेहऱ्यावर टोनर किंवा मॉइश्चरायझर लावा.
३. ऑरगॅनिक मेकअप प्रोडक्ट्स वापरण्याचा प्रयत्न करा.
४. एक्सपायर झालेले मेकअप प्रोडक्ट्स वापरणं टाळा.
हेही वाचा :
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बेस्ट वीज विभागाचा सर्वात मोठा निर्णय
एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार! ‘हा’ बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
डे-केअरमध्ये 15 महिन्याच्या मुलीचा गळा दाबणे, तोंडात पेन्सिल घालणे, शरीरावर चावा घेण्याचा घडला भयंकर प्रकार