पावसाळ्यात नदीपात्र खवळलेले असते, तरीही अनेक तरुण थरारासाठी उडी(jump) घेतात. अशाच एका धाडसाने जुनैद नावाच्या तरुणाचा जीव घेतला. यमुनेचा पूर पाहण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये ५०० रुपयांची पैज लागली आणि जुनैदने पुलावरून नदीत उडी मारली. पण खवळलेल्या पाण्याने त्याला काठावर पोहोचूच दिले नाही.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, नदीच्या काठावर मोठी गर्दी जमलेली होती. जुनैद उडी (jump)मारताच पाण्याच्या वेगाला तोंड देत बराच वेळ पोहण्याचा प्रयत्न करत राहिला. मात्र भोवऱ्यांमुळे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे तो वाहून गेला. काही वेळातच तो पाण्यात अदृश्य झाला.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, एनडीआरएफचे पथक शोध मोहिमेत उतरले आहे. नवादा चेक पोस्टजवळ हा प्रकार घडला आहे.पैजेच्या थरारासाठी घेतलेली ही उडी आता जुनैदच्या कुटुंबासाठी शोककळा बनली आहे.

हेही वाचा :

संत बाळूमामा देवालयातील व्हीआयपी दर्शन बंद….

फोटो लगेच हटवा नाहीतर पब्लिकली कॉल-आऊट करेन सोनाक्षी सिन्हा….

महिलेला जबरदस्ती बाथरूममध्ये नेले,मारहाणही केली… बलात्कारी अभिनेत्याला अटक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *