पंतप्रधान(Prime Minister) नरेंद्र मोदी येत्या १३ सप्टेंबर 2025 रोजी मिझोराम दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात ते नवीन बैराबी-सैरंग रेल्वेचे उद्घाटन करतील. दौऱ्यादरम्यान मिझोरामहून ते मणिपूरकडे जाण्याची शक्यता देखील आहे. मणिपूरमधील हिंसाचारानंतर हा पंतप्रधानांचा पहिला दौरा ठरणार आहे. मे २०२३ पासून मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारात किमान २६० लोक मृत्युमुखी पडले, तर हजारो लोक बेघर झाले होते.

या वृत्तानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले,”जर पंतप्रधान(Prime Minister) मणिपूरला जात असतील, तर ती मोठी गोष्ट आहे का? हिंसाचाराच्या वेळी ते दोन-तीन वर्षांनी जात आहेत. जेव्हा मणिपूर जळत होता, हिंसाचार भडकत होता, तेव्हा तिथे जाण्याची हिंमत झाली नाही. आता मोदीजी पर्यटनासाठी जात आहेत.”
मणिपूरमधील हिंसाचाराची पार्श्वभूमी अशी आहे की, २७ मार्च २०२३ रोजी मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला अनुसूचित जमातीच्या यादीत मैतेई समुदायाचा समावेश करण्यास आदेश दिला. काही दिवसांनीच, ३ मे २०२३ रोजी कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये जातीय हिंसाचार झाला. प्रशासनाने रॅलीवर गोळीबार करण्याचे आदेश दिले आणि संचारबंदी लागू केली. लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांची तैनाती करण्यात आली होती.

संजय राऊत यांनी या घटनेवर पूर्वीही मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते “देशाचे गृहमंत्री मुंबईत राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत, पण मणिपूरमध्ये रॉकेट आणि ड्रोन हल्ले सुरू आहेत, तरीही ते गप्प आहेत. पंतप्रधानांनी तिथे उघडपणे जाऊन आपली उपस्थिती दाखवावी.”राजकीय समीक्षक सांगतात की, पंतप्रधानांचा हा दौरा फक्त रेल्वे उद्घाटनापुरता मर्यादित नाही; मणिपूरमधील सुरक्षितता, सामाजिक स्थैर्य आणि केंद्र सरकारची भूमिका यावरही प्रकाश टाकेल.
हेही वाचा :
पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार
शिल्पा आणि राज कुंद्राच्या वाढल्या अडचणी पोलिसांनी बजावले…
तब्येत बिघडल्याच्या बहाण्याने हॉटेलवर नेलं नंतर….