अमेरिकेच्या H-1B नवीन व्हिसा धोरणामुळे भारतीय शेअर(Shares) बाजार उघडताच मोठी घसरण झाली. IT कंपन्यांना याचा फटका बसला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा आणि कोफोर्ज यासारख्या प्रमुख कंपन्यांचे शेअर्स 6 टक्क्यांपर्यंत घसरले. निफ्टी आयटी इंडेक्स 3 टक्क्यांहून अधिक घसरून 35,482 अंकांवर पोहोचला.

टेक महिंद्राचे शेअर्स(Shares) 5 टक्क्यांहून अधिक घसरून 1.453 या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचले, तर एनएसईवर इन्फोसिस आणि टीसीएसचे शेअर्स अनुक्रमे 1,482 रुपयांनी आणि 3, 065 रुपयांपर्यंत घसरले. एचसीएल टेक 1415 रुपये, कोफोर्ज 1702 रुपये तर एमफेसिसचे शेअर्स 2817 रुपयांनी घसरले. शेअर्समध्ये प्रत्येकी 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. जागतिक मागणीत सुधारणा होण्याच्या संकेतांवर आयटी क्षेत्र सावरत असताना ही घसरण झाली आहे, परंतु ट्रम्पच्या धोरणामुळे पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली आहे.
भारतीय आयटी कंपन्यांसाठी अमेरिकन बाजारपेठ महत्त्वाची आहे. या कंपन्या त्यांच्या उत्पन्नाचा बहुतांश भाग अमेरिकन बाजारपेठेतून मिळवतात. कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना अमेरिकन बाजारपेठेत काम करण्यासाठी पाठवतात, त्यासाठी त्यांना एच-1 बी व्हिसाची आवश्यकता असते. ट्रम्प यांनी आता अचानक या व्हिसाचे शुल्क 100,000 डॉलर्स पर्यंत वाढवले आहे. कंपन्यांना हे शुल्क भरावे लागेल. हा नवीन नियम रविवारपासून लागू झाला.

100,000 डॉलर्स शुल्क केवळ नवीन H-१B अर्जांना लागू होईल, विद्यमान व्हिसा धारकांना नाही. अमेरिकेत नूतनीकरण किंवा पुन्हा प्रवेशासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. यामुळे आयटी कंपन्यांचे नुकसान मर्यादित होईल, परंतु कंपन्या हा भार ग्राहकांना देऊ शकतील की नाही हे अनिश्चित आहे. शुक्रवारी भारतीय बाजार बंद झाल्यानंतर ट्रम्प यांच्या नवीन धोरणाची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून, सोमवारी बाजार उघडल्यावर ट्रम्प यांच्या नवीन व्हिसा धोरणावर आयटी स्टॉक्स लगेच प्रतिक्रिया देतील अशी भीती निर्माण झाली आहे. आयटी स्टॉक्सने आज बाजार तज्ञांच्या या भीतीला खरे सिद्ध केले आणि ट्रेडिंग सुरू होताच अनेक बड्या IT कंपन्यांचे शेअर्स घसरले.
हेही वाचा :
‘या’ एका गाण्यासाठी बॉबी देओलने घातल्या होत्या 9 जीन्स
अक्षय कुमारचा लग्नाबाबत मोठा खुलासा, ट्विंकलसोबत लवकर लग्न….
जायफळाचे ‘हे’ उपाय केल्यास दूर होईल आर्थिक संकट