बॉलिवूडमधील खिडाली अभिनेता अक्षय कुमारविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.(action) अक्षय एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जम्मूला पोहोचला आहे. पण, त्याची जम्मूवारी एका कारणाने चर्चेत आली आहे. ज्या कारमधून अक्षय कुमार जम्मूमधल्या कार्यक्रमस्थळी पोहोचला होता, त्या कारवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी अक्षय कुमारची एसयूव्ही कार जप्त केल्याची माहिती मिळत आहे.जम्मू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या कारला काळ्या काचा होत्या. जम्मूमधील मोटार वाहन कायद्याच्या नियमांनुसार अशाप्रकारे काळ्या काचा लावणे हा गुन्हा आहे. वाहतूक पोलिसांनी नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी तात्काळ अक्षय कुमारच्या गाडीवर कारवाई केली आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार एका खाजगी ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनासाठी जम्मूला पोहोचला आहे. यावेळी अक्षयनं जम्मूपर्यंत ज्या एसयूव्हीनं प्रवास केला. अक्षयची रेंज रोव्हर कार वाहतूक पोलिसांनी जप्त केली. रेंज रोव्हरच्या खिडक्यांना काळी फिल्म लावण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. (action) ही बाब नियमांचं उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे पोलिसांनी थेट अक्षय कुमारची एसयूव्ही ताब्यात घेतली. दरम्यान, जम्मू पोलिसांनी केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे.

अक्षय कुमार संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमासाठी पोहोचला. त्यानं प्रवासासाठी वापरलेली चंढीगडमध्ये नोंद असलेली रेंज रोव्हर क्रमांक CH01 AL 7766 हा आयोजकांनी भाड्यानं घेतली होती. मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमारनं कार्यक्रमस्थळ डोगरा चौक ते जम्मू विमानतळ असा प्रवास केला. चालक विमानतळावरून परत येत असताना, वाहतूक पोलिसांनी डोगरा चौकाजवळ गाडी थांबवली. चौकशीदरम्यान, कारच्या खिडक्यांवर निर्धारित मानकांपेक्षा जास्त काळी फिल्म लावलेली आढळली आणि पोलिसांनी गाडीवर जप्तीची कारवाई केली.

कर्तव्यावर असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांनी चालकाकडे काळी फिल्म लावण्याच्या परवानगीशी संबंधित कागदपत्रं मागितली. पण, तो कोणतेही वैध कागदपत्र सादर करू शकला नाही. त्यानंतर, नियमांनुसार कार जप्त करण्यात आली. मोटार वाहन कायद्यानुसार, कारच्या काचेवर निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त काळी काच किंवा फिल्म लावण्यास मनाई आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे, मग तो सामान्य नागरिक असो वा सेलिब्रिटी.(action) नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असं जम्मू पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, या प्रकरणावर अक्षय कुमारने किंवा त्यांच्या टीमने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

हेही वाचा :

आंबेडकरांना भेटल्यानंतर महाराष्ट्रातील बड्या नेत्यानं असं का म्हटलेलं?

या टोपी खाली दडलय काय या मुकुटाखाली दडलय काय?

लाडक्या वरदविनायक बाप्पाच्या भेटीला भक्तांची मांदियाळी…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *