कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणाने गर्लफ्रेंडचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेहासोबत सेल्फी काढून मित्राच्या मदतीने तो मृतदेह सुटकेसमध्ये(murdered) भरून यमुना नदीत फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकरास अटक केली आहे.

मृत मुलीचे नाव आकांक्षा उर्फ माही (२०) असून आरोपीचे नाव सूरज कुमार उत्तम (२०) असे आहे. माही हनुमंत विहार परिसरातील भाड्याच्या घरात राहत होती आणि दुकानात काम करत होती. सूरजचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याने त्यांच्यात वारंवार वाद व्हायचे. सोमवारी झालेल्या वादानंतर माहीने सूरजला नातं तोडण्याचा आग्रह केला. संतप्त सूरजने माहीचा गळा दाबून तिची हत्या(murdered) केली.
हत्यानंतर सूरजने मित्र आशिष कुमार (२१) याला बोलावले. दोघांनी माहीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून दुचाकीवरून चिल्ला पुलावर नेऊन यमुनेत फेकला. यावेळी सूरजने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी माहीचा मोबाइल कानपूर सेंट्रल स्थानकातील ट्रेनमध्ये ठेवून दिला. तसेच तिच्या घरातील आपले सामान हटवून तो माहीनेच दिल्याचा दावा केला.
२२ जुलै रोजी माही बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसांकडे दाखल केली होती. तपासादरम्यान मोबाईल कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता आले. चौकशीत सूरजने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिस यमुना नदीत मृतदेहाचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे कानपूरसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
अजित पवारांना धक्का! बडे नेते शिंदे गटात दाखल
नवरात्रीच्या उपवासासाठी बनवा पचायला हलका आणि पौष्टिक पदार्थ
ग्राहकांचे बजेट बिघडणार का? सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा उंचावल्या, खरेदीदारांचे हाल!