बॉलिवूडचा(Bollywood) बादशाह शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान सध्या त्याची पहिली वेब सीरिज ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’मुळे चर्चेत आहे. नुकताच या वेब सीरिजचा प्रीमियर सोहळा पार पडला. यासाठी इंडस्ट्रीतील अनेक मोठे स्टार्स उपस्थित होते. पण सर्वांचं लक्ष वेधलं ते एका सौंदर्यवतीनं. आर्यन खानची कथित प्रेयसी, लॅरिसा बोनेसी.गेल्या काही काळापासून, बॉलिवूड वर्तुळात अफवा पसरल्या आहेत की, शाहरुख खानचा मुलगा लॅरिसा बोनेसीला डेट करतोय. जेव्हा ती ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’च्या प्रीमियरला आली तेव्हा या चर्चांचा जोर आणखी वाढला.

‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’च्या (Bollywood)प्रीमियरला ती उपस्थित राहिली, तेव्हा चर्चा आणखी वाढल्या. पण, संपूर्ण सोहळ्यात दोघे कुठेच एकत्र दिसले नाहीत, ना दोघांनी एकत्र फोटो काढले.यानंतर, सर्वांनाच लॅरिसा बोनेसी कोण? हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. लॅरिसा एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे.लॅरिसाचा जन्म ब्राझीलमध्ये झाला आणि तिनं वयाच्या 13 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. अनेक देशांमध्ये मॉडेलिंग केल्यानंतर, 2011 मध्ये ती मुंबईत आली.

मॉडेलिंगच्या माध्यमातूनच लारिसाला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिचा पहिला चित्रपट ‘देसी बॉईज’ होता, ज्यामध्ये तिनं ‘सुबा होने ना दे’ या गाण्यात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलेलं. त्यानंतर लॅरिसा ‘गो गोवा गॉन’मध्ये दिसली. तिनं ‘पेंटहाऊस’ या वेब सीरिज आणि ‘घाटी’ या चित्रपटातही काम केलं.

लॅरिसा अनेक प्रसिद्ध म्युझिक व्हिडीओंमध्येही दिसली. तिनं यो यो हनी सिंगसोबत गाणीही गायलीत.लॅरिसा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे, जिथे तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. सध्या ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’च्या प्रीमियरमधील लॅरिसाचे फोटो व्हायरल होत आहेत.
हेही वाचा :
निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो कांदा…. जाणून घ्या फायदे
आज महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट..
पाकिस्तान विरुद्ध महागड्या ठरलेल्या बुमराहला आज बसवणार का?