सरकारने लाडकी बहीण (Ladki Bahin)योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. केवायसी न केल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.

केवायसी प्रक्रिया

केवायसीसाठी आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य आहे.

आधार नंबर टाकल्यानंतर लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, ज्याद्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण होईल.

याशिवाय, इतर आवश्यक कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन देखील केले जाईल.

कारण आणि पडताळणी

लाडकी बहीण(Ladki Bahin) योजनेत २६ लाखांहून अधिक महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला असल्याचे आधी समोर आले आहे. यावर उपाय म्हणून पुनः पडताळणी सुरू करण्यात आली आहे. ही पडताळणी अंगणवाडी सेविकांद्वारे केली जात आहे, ज्यात अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत.

सध्या या योजनेचा लाभ घेणाऱ्या जवळपास २ लाख ३० हजार महिलांना आता केवायसी करण्याची अनिवार्य सूचना दिली आहे. महिलांना दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, त्यात त्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.या नवीन उपाययोजनेमुळे योजनेतील पारदर्शकता वाढवणे आणि अपात्र लाभार्थ्यांवर नियंत्रण ठेवणे हे उद्देश आहे.

हेही वाचा :

कतरिना कैफ ४२ व्या वर्षी आई होणार…४० नंतर गर्भधारणा शक्य आहे…

WhatsAppच्या नव्या अटींमुळे युजर्स फसले

अतिवृष्टीमुळे डोळ्यांत पाणी, मुख्यमंत्री फडणवीसांनी केली पाहणी…..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *