मोहम्मद रिजवानच्या कॅप्टनशिपखाली पाकिस्तानसोबत हे काय झालं?. 34 वर्षात जे झालं नव्हतं, ते क्रिकेट फिल्डवर पहायला मिळालं. पाकिस्तानला वेस्ट इंडिजकडून सर्वात मोठ्या पराभवाचा स्वाद चाखावा लागला.वेस्ट इंडिजकडून पाकिस्तानला मोठ्या पराभवाचा सामना (Match)करावा लागला आहे. हा पराभव वनडे सीरीजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात झाला. वेस्ट इंडिजने शे होपच्या नेतृत्वाखाली 2-1 ने सीरीज जिंकली. वेस्ट इंडिजने तिसऱ्या वनडे सामन्यात पहिली फलंदाजी केली. 50 ओव्हर्समध्ये 6 विकेटवर 294 धावा केल्या.

सीरीज डिसायडर सामन्यात(Match) वेस्ट इंडिजला या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात कॅप्टन शे होपने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने पुढे राहून नेतृत्व केलं. शे होपने सेंच्युरी मारली. वनडे क्रिकेटमधील त्याचं हे 18 व शतक ठरलं. पाकिस्तान विरुद्ध त्याचं हे दुसर शतकं होतं. शे होपने 94 चेंडूत नाबाद 120 धावा केल्या. यात 10 चौकार आणि पाच षटकार होते. कॅप्टन होपच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर वेस्ट इंडिजने दमदार धावसंख्या उभारली.आधी 42 ओव्हर्समध्ये 6 विकेटवर 185 धावा झालेल्या. वेस्ट इंडिजने अखेरच्या 8 ओव्हर्समध्ये 109 धावा फटकावल्या.

हे शक्य झालं, होपच्या स्फोटक फलंदाजीमुळे. मालिकेतला हा निर्णायक सामना(Match) होता. पाकिस्तानसमोर विजयासाठी 295 धावांच लक्ष्य होतं. सध्याच्या क्रिकेटमध्ये हे लक्ष्य अशक्य नाहीय. पण वेस्ट इंडिज विरुद्ध हे लक्ष्य गाठताना पाकिस्तानला खूप अडचणी आल्या. पाकिस्तानी टीमसाठी लक्ष्याच्या आसपास पोहोचणं दूर राहिलं, ते 100 धावा सुद्धा करु शकले नाहीत. तिसऱ्या वनडेमध्ये पाकिस्तानी टीम 92 रन्सवर ऑलआऊट झाली. परिणामी वेस्ट इंडिजने हा सामना 202 धावांनी जिंकला. धावांच्या हिशाबाने पाकिस्तानवर मिळवलेला हा मोठा विजय आहे. या बाबतीत 2015 साली ख्राइस्टचर्च वनडेमध्ये 150 धावांनी मिळवलेल्या विजयाचा रेकॉर्ड मोडला.
वनडे क्रिकेटमधील ही चौथी वेळ आहे, जेव्हा वेस्ट इंडिजची टीम 200 प्लसपेक्षा जास्त धावांच्या अंतराने जिंकली आहे. पाकिस्तानाला शे होपने गुडघे टेकायला भाग पाडलं. त्याचवेळी वेगवान गोलंदाज जायडन सील्सने आग ओकणारी गोलंदाजी केली. त्याने निम्मा पाकिस्तानी संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. त्याने 7.2 ओव्हरमध्ये 18 धावा देऊन 6 विकेट काढल्या. त्याच्या करिअरमधील हे बेस्ट प्रदर्शन आहे.वेस्ट इंडिजने पाकिस्तान विरुद्ध फक्त तिसरा वनडे सामना जिंकला नाही, तर सीरीजही जिंकली.
वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सीरीज न गमावण्याचा मागच्या 34 वर्षांपासूनचा पाकिस्तानचा रेकॉर्ड मोहम्मद रिजवानच्या नेतृत्वाखाली मोडला गेला. वेस्ट इंडिजने पाकिस्तान विरुद्ध 1991 नंतर पहिल्यांदा वनडे सीरीज जिंकली आहे. वर्ष 2000 नंतर आतापर्यंत कुठल्याही फॉर्मेटमध्ये वेस्ट इंडिजने पाकिस्तानवर मिळवलेला पहिला मालिका विजय आहे.
हेही वाचा :
वाईन आणि शँपेन काय आहे अंतर, पिण्याऱ्याला देखील नसेल माहिती?
मृत्यूनंतर बँक खात्यातील पैशाचं काय होतं? RBI ने जारी केले नवीन नियम
रील्स स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे मेंदूवर होणारे पाच घातक परिणाम