भारतीय रिझर्व्ह बँकेने(banking system) आज म्हणजेच ४ ऑक्टोबर २०२५ पासून बँकिंग सिस्टिममध्ये महत्त्वाचा बदल लागू केला आहे. या बदलामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार असून व्यवहारातील गती आणि पारदर्शकता वाढणार आहे. आतापर्यंत चेक क्लिअर होण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत होता, मात्र आता ही प्रक्रिया त्याच दिवशी पूर्ण होणार आहे.

फास्ट चेक क्लिअरन्स सिस्टिमची अंमलबजावणी :
आरबीआयने ‘फास्ट चेक क्लिअरन्स सिस्टिम’ सुरु केली आहे. या अंतर्गत सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत जमा झालेले सर्व चेक त्वरित स्कॅन करून क्लिअरिंग हाऊसला पाठवले जातील. बँकांना(banking system) हे चेक संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कन्फर्म करणे बंधनकारक असेल. जर वेळेत उत्तर दिले गेले नाही, तर तो चेक आपोआप क्लिअर मानला जाईल.

दोन टप्प्यांमध्ये होणार अंमलबजावणी

टप्पा १ : ४ ऑक्टोबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ – बँकांना चेक कन्फर्म करण्यासाठी ७ वाजेपर्यंतची मुदत मिळेल.

टप्पा २ : ३ जानेवारी २०२६ पासून – बँकांना चेक कन्फर्म करण्यासाठी केवळ ३ तासांचा अवधी मिळेल. उदाहरणार्थ, सकाळी १० वाजता जमा झालेला चेक दुपारी २ वाजेपर्यंत क्लिअर करावा लागेल. यामुळे चेक क्लिअरन्स प्रक्रिया आणखी वेगवान आणि कार्यक्षम होईल.

सुरुवातीला फक्त मोठ्या शहरांमध्ये होणार :
ही नवी व्यवस्था सुरुवातीला दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या क्लिअरिंग ग्रिडवर लागू करण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशभर हा नियम लागू होईल. यामुळे बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर अधिक मजबूत होईल आणि ग्राहकांचा अनुभव सुधारेल.

आरबीआयने मोठ्या रकमेच्या चेकसाठी Positive Pay System अनिवार्य केली आहे. यात ग्राहकांनी चेकची महत्त्वाची माहिती बँकेला आधीच द्यावी लागते. यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल आणि चुकीचे चेक ऑटो-क्लिअर होणार नाहीत.

या नव्या व्यवस्थेमुळे ग्राहकांना चेकमधून पैसे त्याच दिवशी मिळतील. त्यामुळे व्यवहारातील अनिश्चितता कमी होऊन व्यवसायातील कॅश फ्लो अधिक सुरळीत होईल. बँकिंग प्रणाली अधिक कार्यक्षम, जलद आणि विश्वासार्ह होणार आहे.

हेही वाचा :

 ‘जास्त उडू नकोस..’ फराहने पापाराझींसमोरच कुक दिलीपला सुनावलं, वागणूक पाहून चाहते…

सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले

फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *