कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
गुन्हे किती घडले, किती उघडकीस आले, किती गुन्हेगारांना शिक्षा झाली,(committed)याची आकडेवारी दिली जाते किंवा ती अधिकृतरित्या उपलब्ध होऊ शकते. वास्तविक गुन्हेच घडू नयेत असे वातावरण अपेक्षित असते, पण प्रत्यक्षात तसे घडणे अशक्यच. वास्तवामध्ये गुन्ह्यांचा टक्का क्वचित कधीतरी कमी होतो. गुन्ह्यांचा आलेख वाढतच त्यासाठी सायबर क्राईम चे उदाहरण देता येईल. तो गेल्या तीन वर्षात सातत्याने वाढतच चालला आहे. उघडकीस येण्याचे प्रमाण 25% आहे म्हणजे 75% गुंठे उघडकीस आलेले नाहीत आणि तशी शक्यताही नाही. सायबर क्राईम होऊच नये यासाठी जनजागरण, लोकप्रबोधन महत्वाचे आहे शिवाय घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस प्रशासनात अति कुशल मनुष्यबळ उपलब्ध असणे आवश्यक आहे.

गृहमंत्री पद सांभाळत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईत देशातील पहिल्या सायबर गुन्हे सुरक्षा केंद्राचे उद्घाटन केले. सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवणे, ते घडूच नयेत यासाठी जनजागरण, लोकप्रबोधन करणे, शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना त्यासंबंधीचे मार्गदर्शन करणे असे या केंद्राचे काम असणार आहे.(committed) अशा केंद्राच्या शाखा आता जिल्हा निहाय असतील प्रत्येक जिल्ह्यात सायबर क्राईम सेल आहे माहिती व तंत्रज्ञान युगात सायबर क्राईम वाढला आहे आणि तो येथून पुढे वाढतच जाणार आहे. त्यामुळे सुजाण नागरिक अशा गुन्ह्यांना बळी पडणार नाहीत अशी पिढी घडवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात सायबर गुन्हे प्रतिबंधक धडे शिकवले पाहिजेत.
पोलीस प्रशासनात पोलीस विशेष शाखा एल आय बी, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, रेल्वे विभाग, समाज शाखा विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा, असे काही विभाग आहेत. (committed)या विभागांना साईड ब्रांच म्हटले जाते. काही अपवाद वगळले तर साईड ब्रांच मध्ये काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाच्या मुख्य प्रवाहात राहून काम करायची इच्छा असते. साईड ब्रांच मध्ये काम करणे म्हणजे शिक्षा अशी मानसिकता या शाखेमध्ये काम करणाऱ्यांची असते. परिणामी अतिशय प्रभावीपणे या शाखेतील कर्मचारी आणि अधिकारी काम करतातच असे म्हणता येणार नाही. अर्थात त्यालाही काही सन्माननीय अपवाद आहेत. म्हणूनच पोलीस प्रशिक्षण केंद्रात किंवा महाविद्यालयात अकादमी सायबर क्राईम विषयक प्रशिक्षण दिले पाहिजे आणि असे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलीस व अधिकाऱ्यांना अशा क्राईम सेलमध्ये नियुक्त केले पाहिजे.सायबर क्राईम विविध प्रकारचे असतात. आर्थिक फसवणूक, डिजिटल ऍरेस्ट, मालवेअर हल्ले अर्थात डेटा चोरी, ऑनलाइन फसवणूकलैंगिक अत्याचार किंवा फसवणूक असे अनेक प्रकारचे गुन्हे सायबर क्राईम मध्ये येतात. अशा गुन्ह्यांना सर्वसामान्य माणूस फसत नाही कारण त्याच्याकडे गमावण्यासारखे काहीच नसते.
डॉक्टर, वकील, व्यापारी, प्राध्यापक, अभियंते, या मंडळींनाच सायबर क्राईम ला सामोरे जावे लागले आहे. उदाहरण द्यायचे झाले तर कोल्हापुरातील सेवानिवृत्त प्राध्यापकाचे देता येईल, वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीचे देता येईल. कोल्हापुरात सायबर क्राईमच्या माध्यमातून अनेकांना कितीतरी कोटी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे.(committed)म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे, जंगम मालमत्ता आहे, ज्यांच्याकडे बँक अकाउंट आहे, त्यांनाच सायबर क्राईम मध्ये अडकवले जाते आणि त्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. आता तर डीप फेक साठी “ए आय” चा वापर प्रामुख्याने केला जातो आहे.चित्रपट अभिनेता अक्षय कुमार याची मुलगी ऑनलाईन गेम खेळत असताना तिचा मोबाईल हॅक करण्यात आला. तुम्ही चांगले खेळत आहात असे गोड बोलून सायबर क्रिमिनल ने तिच्या मोबाईलवर न्यूड फोटो पाठवले. पण ती हुशार असल्यामुळे बचावली. ती फसली नाही. हे अक्षय कुमार यांनीच ट्विटवर सांगितले आहे.
पुण्याला आयटी सेंटर म्हणून राज्यात ओळखले जाते. सर्वाधिक युवक आणि युवती पुण्याच्या आयटी च्या माध्यमातून विविध कंपन्यांमध्ये काम करतात.पुणेकर हा अतिशय चोखंदळ, सहज कुणाला फसणार नाही म्हणून ओळखला जातो. पण राज्यात सर्वाधिक गुन्हे पुणे शहरातच घडलेली आहेत आणि गेल्या दोन वर्षात सहा हजार कोटी रुपयांचा चुना सायबर क्रिमिनलनी पुणेकरांना लावला आहे.इसवी सन 2023 मध्ये देशात 24 लाख सायबर गुन्हे घडले होते. गतवर्षी देशात 36 लाख गुन्हे सायबर ॲक्ट खाली नोंदले गेले आहेत. दिनांक 30 जून 2025 ते सप्टेंबर 2025 या दरम्यान एक लाख सहा हजार सायबर गुन्हे घडले आहेत.

मुंबई शहरात 4849, ठाणे शहरात 680 गुन्हे आतापर्यंत या वर्षात नोंदवले गेले आहेत. अशा प्रकारचे गुन्हे करण्यात उच्चशिक्षित सहभागी आहेत. ते आयटी क्षेत्रातील कुशल आहेत. विशेष म्हणजे या सायबर गुन्हेगारांना प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन काम करायची गरज नसते. एका ठिकाणी अर्थात सुरक्षित ठिकाणी बसून त्यांच्याकडून अशा प्रकारचे गुन्हे केले जात असतात. अशा या सायबर क्रिमिनल्सना ” एआय” तंत्रज्ञान मदतीसाठी उपलब्ध झाले आहे. एकूणच सायबर क्राईम वाढत चालला आहे आणि चिंता ही वाढली आहे. त्यासाठी खबरदारी घेणे हाच एकमेव प्रभावी पर्याय आहे.
हेही वाचा :
‘जास्त उडू नकोस..’ फराहने पापाराझींसमोरच कुक दिलीपला सुनावलं, वागणूक पाहून चाहते…
सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले
फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर