भारताच्या डिजिटल पेमेंट (payments)जगतात क्रांतिकारी बदल घडवणारे नवे फीचर “UPI Circle” आता BHIM UPI अॅपमध्ये उपलब्ध झाले आहे. या फीचरमुळे यूझर्सना त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा जवळच्या व्यक्तींना त्यांच्या खात्यातून थेट व्यवहार करण्याची परवानगी देता येणार आहे — तेही सुरक्षितपणे आणि पूर्ण नियंत्रणासह.

सर्वात खास बाब म्हणजे, तुमच्या बँक खात्यात शिल्लक रक्कम नसली तरीही तुम्ही UPI पेमेंट करू शकता. या सुविधेसाठी कोणत्याही थर्ड पार्टी अॅपची किंवा कॉलची गरज नाही.
UPI Circle वापरण्याची पद्धत:
BHIM अॅपमधील UPI Circle पर्याय निवडा.
“Add Family or Friends” वर क्लिक करून विश्वासू व्यक्तींचे नंबर किंवा UPI आयडी जोडा.
सर्कल तयार झाल्यानंतर दोन पर्याय उपलब्ध होतील:
Spend with Limit: खर्चाची मर्यादा ठरवता येते.
Approval Required: प्रत्येक व्यवहारासाठी तुमची मंजुरी आवश्यक राहते.

हे फीचर विशेषतः वृद्ध व्यक्ती, विद्यार्थी आणि बँक खाते नसलेल्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे कुटुंबातील सदस्य एकमेकांसाठी व्यवहार करू शकतील, पण नियंत्रण मुख्य खातेदाराकडेच राहील.
BHIM UPI Circle हे भारतातील डिजिटल पेमेंट(payments) सिस्टमला नवी दिशा देणार असून, “डिजिटल इंडिया”च्या प्रवासात आणखी एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे.
हेही वाचा :
कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न…
शिल्लक राहिलेल्या चपातीसपासून सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट लाडू
दिवाळीआधी सरकारची मोठी घोषणा! खात्यात 8 टक्के जास्त रक्कम….